शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दर घसरण्याच्या भीतीने मालपूर परिसरात कांदा काढणीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ...

हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री होत होता. मात्र, अचानक या आठवड्यात निम्म्यावर २०-२१ रुपयांवर आला. अजून भाव घसरून कवडीमोल भावाने कांदा विक्री करावा लागू नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी हे पीक काढायला सुरुवात केली आहे. अन्यथा अजून कांदा पूर्ण तयार व्हायला एक महिन्याचा कालावधी लागला असता. यामुळे वजनात घट येणार यासाठी शेतकरी हा कुठेना कुठे नाडलाच जात असल्यामुळे कुठे गेला तुमचा हमीभाव, अशी विचारणा करताना दिसून येत आहे.

दोन हजार रुपये क्विंटल गहूदेखील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या १५००-१६०० क्विंटलने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही नित्याची बाब झाली आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी भाव नको याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही आमच्या नशिबाचा भाग आहे. ४० रुपयांचा कांदा २० रुपये झाला. तो पाच रुपये किलोने विकावा लागू नये म्हणून आज तयार होण्याच्या अगोदर इच्छा नसताना काढावा लागला. कुठे गेला तुमचा हमीभाव. यामुळे शेती तोट्याची ठरत आहे, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी वामन माळी यांनी व्यक्त केली आहे.