चारा प्रक्रियेवर शेतकऱ्यांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:33 IST2021-08-01T04:33:24+5:302021-08-01T04:33:24+5:30

निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यामध्ये वापरला, तर जनावरांची शारीरिक वाढ, तसेच दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. ...

Farmers' workshop on fodder processing | चारा प्रक्रियेवर शेतकऱ्यांची कार्यशाळा

चारा प्रक्रियेवर शेतकऱ्यांची कार्यशाळा

निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यामध्ये वापरला, तर जनावरांची शारीरिक वाढ, तसेच दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. कोरड्या चाऱ्यातील पोषणमूल्यांची वाढ करण्यासाठी युरियाचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे जनावरांना आवश्यक प्रथिने, ऊर्जा, खनिजे मिळतात. हे मार्गदर्शन करताना कृषीदूतांनी यावेळी शेतकरीवर्गाच्या विविध शंका, समस्यांचे निरसन केले.

या कार्यक्रमास मालपूरचे माजी सरपंच हेमराज पाटील, सुरायचे श्याम ठाकरे, शेतकरी नानासाहेब पाटील, देविदास बागुल, शिवाजी माळी, श्रीपत पाटील, जगतराव पाटील, शंकर पाटील, बापू कोळी, अरुण पाटील, पंकज पाटील, अनिकेत खंडेराय उपस्थित होते.

हा कृषी दौरा पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल, कार्यक्रम समन्वयक प्रा. चंद्रशेखर पाटील, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. मुकेश कोळी आणि प्रा. कापघाते सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Farmers' workshop on fodder processing