शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराचा रोड टॅक्स माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:14 IST

खाजगी बस असोसिएशन : प्रशासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनमुळे खाजगी बस, ट्रॅव्हल्स मालकांचे नुकसान झाले असून एक वर्षाचा रोड टॅक्स माफ करावा अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा तसेच मालेगाव तालुका खाजगी बस, ट्रॅव्हल्स असोसिएशनने केली आहे़असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ निवेदनाच्या प्रती खासदार सुभाष भामरे, आमदार फारुख शहा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देखील देण्यात आल्या आहेत़निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे १४ मार्चपासून प्रवासी बस वाहतूक बंद आहे़ ट्रॅव्हल्स मालकांसह त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यवसाय देखील ठप्प आहेत़ वाहन चालक, वाहक, कार्यालयीन कर्मचारी यांना देखील आर्थिक फटका बसला आहे़ सलग तीन महिने रोजगार बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ मालकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ तसेच पुढील सहा महिने व्यवसाय पूर्वपदावर येण्याची चिन्हे नाहीत़खाजगी प्रवासी बस मालक सर्वाधिक कर भरतात़ त्यामुळे किमान एक वर्षाचा रोड टॅक्स माफ करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ या प्रमुख मागणीसह बसेसचा विम्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी, मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, बँकांच्या कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करावे, कार्यालयीन कर्मचारी, बस चालक, वाहक यांनाही आर्थिक मदत द्यावी, इंधनावरील अतिरिक्त भार रद्द करावा, खाजगी बसेसला एक वर्षासाठी टोलमाफी द्यावी, वर्षभराचा जीएसटी कर माफ करावा, बस कर्मचाºयांना कोरोना योध्दे घोषीत करुन ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, फिजीकल डिस्टन्सिंगमुहे केवळ पन्नास टक्के प्रवासी बसवावे लागतील़ त्यामुळे पुढील काळात रोड टॅक्स देखील पन्नास टक्के आकारावा़

टॅग्स :Dhuleधुळे