दुरध्वनीवर दिवसभर शिव्या ऐकूनही बोलावे लागते प्रत्येकाशी गोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:02 PM2021-01-18T23:02:28+5:302021-01-18T23:03:08+5:30

सर्व काही विसरून गोड प्रत्येकाची गोड बोला, महापालिका अग्निशमन विभागातील कर्मचारी मनोहर बिडकर यांचा सल्ला

Even after hearing swear words on the phone all day long, you have to talk sweetly to everyone | दुरध्वनीवर दिवसभर शिव्या ऐकूनही बोलावे लागते प्रत्येकाशी गोड 

dhule

Next

चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची तातडीने मदत होण्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मात्र या टोल फ्री क्रमांकांवरून मदतीसाठी कमी तर दारू पिवून शिव्या देणारे अधिक असतात. त्यामुळे प्रत्येक दिवस व रात्र नेहमी दुरध्वणीवरून शिव्या  एैकाव्या लागतात. तरीही सर्व काही विसरून प्रत्येकांशी गोड बोलावे लागते. असे मत  अग्निशमन विभागातील कर्मचारी मनोहर बिडकर यांनी संक्रांतीचे औचित्य साधून गोड बोलण्याचे आवाहन केले        आहे. 
 पांझरा नदीकाळावर अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे. नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.  कार्यरत असलेले कर्मचारी मनोहर बिडकर म्हणाले की, अग्निशमन विभागाचा क्रमांक टोल फ्री असल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला बॅलन्स लागत नाही. त्यामुळे करमणूक होण्यासाठी रात्री १२ नंतर व्यक्ती दारू पिवून काॅल करतात. फोन केल्यावर काहीही विचार न करता शिव्या देण्यास सुरवात करतात. कर्मचारी असल्याने त्यांच्याशी प्रेमाणेच बोलावे लागते. त्यामुळे दिवसभर शिव्या ऐकून ही कधी राग, कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी चिडचिड होत नाही किंवा वाद देखील होत नाही.  सर्व काही कार्यालयातच विसरून घरी जातो.  फोन वरून दरराेज शिव्या देणारे ठरलेले असतात. फोन घेतल्यावर तो शिव्या देईल हे माहिती असते. मात्र त्या फोनकडे दुर्लक्ष केल्यास एखादा गरजू व्यक्तीला मदत मिळू शकणार नाही. याचे भान ठेवावे लागते. असेही बिडकर यांनी सांगितले.

Web Title: Even after hearing swear words on the phone all day long, you have to talk sweetly to everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.