शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्सिंग ठेवत भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:27 IST

श्री एकवीरा देवी यात्रौत्सव रद्द : हनूमान जयंतीनिमित्त कार्यक्रम रद्द; देशावरील ‘कोरोनाचे संकट जावू दे’ ची केली प्रार्थना

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला आहे़ त्यामुळे सण, धार्मिक उत्सव, यात्रौत्सव, लग्नसमारंभ रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा धुळेकरांना पहिल्यांदा चैत्र नवरात्रौत्सव तसेच हनूमान जयंती भाविकांना साजरी करता आली नाही.देशात कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाकडून विविध उपाय-योजना केल्या जात आहे़ नागरिकांना देखील विषाणू संसर्ग टाळण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे़ या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी घराबाहेर जाणे टाळल्याने शहरातील रस्ते व परिसरात शुकशुकाट दिसुन येत आहे़सोशल डिस्टन्सिंग नतमस्तकदरवर्षी शहरातील गल्ली नं. २ मधील श्री लालबाग हनुमान मंदिरात दरवर्षी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम होतात़ मात्र यंदा देश कोरोेनाच्या संकटात सापडल्याने मंदिर प्रशासनाने जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे जयंतीपूर्वीच कार्यक्रम रद्द झाल्याची सुचना लावण्यात आली होती़ बुधवारी हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी तुरळक गर्दी दिसुन आली़ तर काही मंदिर बंद असल्याने मंदिराबाहेरूनच भाविकांनी दर्शन घेतले़शहरातील वाडीभोकर रोडवरील दक्षिण मुखी मारूती मंदिर, पांझरा किनारी असलेले पंचमुखी हनुमान मंदिर, पारोळा रोडवरील नवसाचा मारूती, मिल परिसरातील सोन्या मारूती मंदिर, अहिल्या देवी नगरातील मारूती मंदिरातील कार्यक्रम रद्द झाले आहेत़मंदिर परिसरात शुकशुकाटचैत्र नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षी हनुमान जयंतीपासून श्री एकवीरा देवीची यात्रौत्सवा प्रारंभ होत असतो. यात्रौत्सवात हजारो भाविक राज्यभरातून दाखल होतात़ देवीचा नवस, जाऊळ, शेळी उतरविण्यासाठी भाविकांची परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ त्यामुळे मंदिराचा परिसर चैत्र महिन्यात गजबजलेला असतो़ मात्र यंदा कोरोनामुळे यात्रौत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी अनेकांनी घरीच जाऊळ काढून देवीची पुजा केली़सोशल डिस्टन्सिंगद्वारे आरतीमंदिरात मंगळवारी व बुधवारी श्रीएकवीरा देवी मंदिरात भाविकांनी गर्दी न करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळत देवीची आरती केली़ यावेळी अनेकांनी देवीकडे देशावर आलेले संकट दुर होण्याचे साकडे घातले़मंदिर पसिरात देवीची मिरवणूकयात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंतीला शहरात श्री एकविरादेवीची वाजतगाजत पालखी शोभायात्रा काढली जाते. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही पालखी रात्री उशीरा मंदिरात पोहचते. पालखीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत व आरती केली जाते. यंदा मात्र शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. परंपरा खंडीत होऊ नये यासाठी मंदिर परिसरातून बुधवारी पालखी फिरवून परत मंदिरात आणण्यात आली. पालखी सोबतही पुजारी सोशल डिस्टन्सिंग ठेऊन चालत होते.

टॅग्स :Dhuleधुळे