शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या घरांवर पहाटे दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:36 IST

घरातील खिडक्यांसह कारच्या काचा फुटल्या : जीवघेण्या हल्ल्यापासून भोसले परिवार सुखरुप

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या घरावर मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास कोणीतरी दगडफेक केली़ यात घरांच्या खिडकीच्या आणि अंगणात उभ्या असलेल्या कारचे काचा फूटल्या़देवपुरातील गोंदूर रोडवरील शिवसागर मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस धनदाई नगर आहे़ याठिकाणी रणजित राजे भोसले यांचे निवासस्थान आहे़ पहाटे दीड वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञातांनी त्यांच्या घरावर जिवघेणा हल्ला करीत दगडफेक केली़ त्यात खिडक्यांच्या काचा, दारापुढे लावलेली एमएच १८ बीएच २१५७ क्रमांकाच्या कारचे काचा फुटल्या, सुदैवाने भोसले परिवार सुखरुप असून कोणालाही काहीही दुखापत झाली नाही़ आवाज ऐकून भोसले घराबाहेर आले़ तोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांनी पळ काढला होता़या प्रकारानंतर सकाळी पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक सतिष गोराडे व पथक त्यांच्या घरी दाखल झाले होते़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रणजित राजे भोसले यांनी फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे