शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

धुळ्यात भल्या पहाटे अवैध डांबर कारखाने उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 5:17 PM

पोलीस अधीक्षकांची कारवाई : १० जणं ताब्यात

धुळे :  पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी मंगळवारी भल्या पहाटे  तालुक्यातील दिवाणमळा, अनकवाडी व मुकटी परिसरात अचानक छापा टाकून अवैध डांबर कारखाने उध्वस्त केले. येथून दोन ट्रक पांढºया रंगाची पावडर, रिकामे ड्रम, एक टँकर, तीन मिक्सर मशीन आदी लाखोंचे साहित्य जप्त करण्यात आले़ याप्रकरणी ८ ते १० जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ दरम्यान, याच साहित्याच्या माध्यमातून डांबर बनवून ते काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा संशय पोलीस अधीक्षक यांना आहे़ जिल्ह्यात बºयाच ठिकाणी अवैध धंदे फोफावले आहेत़ परिणामी काही भ्रष्ट पोलिसांशी हातमिळवणी करुन अवैध धंदेवालक सध्या चांगलेच मालामाल होत आहेत़ यासंदर्भात तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती़ अशातच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पहाटे अचानक धाडसत्र अवलंबिले़ मोहाडी आणि तालुका पोलिसांच्या हद्दीत असलेल्या दिवाणमळा, मुकटी, अनकवाडी गावाजवळ धाड टाकून काळे डांबर बनविण्याचे कारखाने उध्वस्त केले़ दिवाणमळा परिसरात कारवाई करुन डांबर बनविण्याचे साहित्य, एक मिक्सर, मशीन जप्त करण्यात आले़ अनकवाडी गावाजवळील जंगलात एक टँकर, रिकामे ड्रम, दोन ट्रक पांढºया रंगाची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले़ मुकटी परिसरातही डांबर बनविण्याचा कारखाना आढळून आला आहे़ या तिनही ठिकाणाहून डांबर बनविण्याचे साहित्य आढळून आले असून तो सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे़ पहाटेच्या सुमारास पोलीस अधीक्षकांनी कारवाई करुन ८ ते १० जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे कंबरडे चांगलेच मोडले असून प्रभारी अधिकाºयांना देखील कारवाई करणे भाग पडले आहे़ अवैध धंद्यांच्या चालकांची आणि मालकांची माहिती मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी