शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 22:45 IST

शिरपूर : बोराडी परिसरात मॉर्निंग वॉक करणाºयांना बिबट्या दिसला

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे-दभाषी गावाजवळील तापी नदीवरील पूलानजिक रस्ता ओलांडणाºया एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देवून जागीच ठार केल्याची घटना घडली़ घटनेचे वृत्त शिरपूर टोलनाक्यावरील अधिकाºयांना कळताच त्यांनी पोलिस व वनविभागाला कळविले़१४ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ सावळदे गावाजवळील तापी नदीपूल ओलांडत असतांना हनुमान मंदिरसमोर पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे जाणारा बिबट्या (मादी) ला  अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून पसार झाला़ घटनेचे वृत्त शिरपूर टोल नाक्यावरील अधिकारी व कर्मचाºयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ तोपर्यंत बिबट्या ठार झालेला होता़घटनेचे वृत्त पोलिस प्रशासन व वनविभागाला कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झालेत़ मयत अवस्थेत वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले़बोराडी परिसरात बिबट्या दिसला बोराडी येथील कर्मवीर नगरातील रहिवाशी हिंमत पवार व योगेश गोसावी हे दोघे १५ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता फिरण्यासाठी  शिरपूर-बोराडी रस्त्यावरील नांदर्डे नर्सरीपर्यंत जातात. ते नेहमीप्रमाणे घाटी उतरून खाली गेल्यानंतर समोरून काहीतरी गेल्याचा भास झाला. पण लगेच रस्त्याच्या बाजुला त्यांना बिबट्या उभा असल्याचे दिसले. आकाराने मोठा असुन त्याच्या अंगावर पट्टे असल्याचे दिसून आले. त्या दोघांचा भितीने अंगाचा थरकाप झाला. पण नशीब बलवत्तर असल्याने शिरपूरकडून येणाºया एका वाहनाला हात  दाखवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गाडी चालकाला कोण असेल म्हणून तो वाहनचालक थांबायला तयार नव्हता. अक्षरश: विनवणी करुन ते दोघे बोराडी पर्यंत आले. कदाचित त्यावेळी वाहन आले नसते तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती़ त्यामुळे रात्री-पहाटे फिरणाºया लोकांनी यापुढे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे़ वने नष्ट होत असल्यामुळे प्राणी देखील अन्न व पाण्यासाठी रस्त्यावर येवू लागले आहेत़ अनेकदा महामार्गावर रस्ता ओलांडतांना प्राण्याचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ घडणाºया घटनांकडे गांभिर्याने पाहण्याची वेळ आहे़ वनविभागाचे तक्रारींकडे दुर्लक्ष जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या दिसला, पाळीव प्राण्यांवर हल्ला, त्यात पशुधनाचे नुकसान असे अनेक प्रकार प्रत्ययास येत आहेत. जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने बिबट्याचा शेतशिवारांसह गावांच्या जवळील भागात वावर वाढला आहे. साक्री तालुक्यातील म्हसदी परिसरात अद्याप बिबट्याची दहशत कायम असून त्याचा विपरित परिणाम शेती हंगामावरही होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही निदर्शनास आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वनविभागाने हस्तक्षेप केल्यास काही प्रमाणात  शेतकºयांसह मजूरवर्गालाही दिलासा मिळू शकणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे