शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ़ तात्या लहाने चित्रपटात चहावाल्याची भूमिका साकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:41 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क ‘तेंडल्या निघाला आॅस्करला’ या चित्रपटासाठी कलावंत पाहीजेत, अशी जाहिरात इलेक्टॉनिक्स मीडियावर झळकली होती़ ...

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्क‘तेंडल्या निघाला आॅस्करला’ या चित्रपटासाठी कलावंत पाहीजेत, अशी जाहिरात इलेक्टॉनिक्स मीडियावर झळकली होती़ ही जाहीरात पाहताच न घाबरता मुंबईत पहिल्यांदा चित्रपटात करीअर करण्यासाठी पाऊल टाकले़ मेहनत व जिद्द मनात असल्याने माझे या चित्रपटात सिलेक्शन झाले आणि आज अहिराणी, मराठी व हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले़ लवकरच माझा ‘झांगडू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे खान्देशी कलावंत भटू चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़प्रश्न : आगामी झांगडू चित्रपटाचे चित्रीकरण कुठे झाले?उत्तर : योगेश ढोकणे निर्मित्त झांगडू हा मराठी चित्रपट येत्या तीन महिन्यात रिलीज होणार आहे़ या चित्रपटात माझी मुख्य भुमिका आहे़ झांगडू या चित्रपटाचे चित्रीकरण करमाळा, अहमदनगर, बारामती, सातारा, पुणे व कोल्हापुर येथे झाले आहे़ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच राहूरी येथे झाले आहे़प्रश्न : आतापर्यत किती व कोणत्या चित्रपटात भुमिका साकारली आहे़?उत्तर : आतापर्यत राजभाषा, हलके-फुलके, पाशबंध, सार्थक, झागंडू, डॉ़ तात्या लहाणे, ड्रिम जॉब, बे दुणे चार अशा १० ते १२ मराठी, हिंदी व अहिराणी चित्रपटांसह शार्ट फिल्म, खान्देशी गाणे, नाटीका, तारक मेहता का उलटा चष्मा अशा चित्रपट व मालिकेत भुमिका साकारली आहे़ तसेच चित्रपटात करीअर म्हणुन पाहणाऱ्या खान्देशातील अनेक कलावतांना चित्रपट व नाटकात काम करण्याची संधी मिळवून दिली आहे़प्रश्न : करीअर करण्याची संधी कशी मिळाली?उत्तर : मनापासुन जिद्द होती़ प्रा़ अनिल सोनार यांच्या माध्यमातून मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली़ आजपर्यत मराठी अभिनेता मकरंद अनासपूरे, निशिगंधा वाड, राजेश्वरी खरात, विजय चव्हाण, रमेश देव, अलका कुबल, नंदिता धुरी, कुशल बद्रिके आदींसह मला काम करण्याची संधी मिळाली आहे़प्रशासनाचे कलावंताकडे दुर्लक्षजिल्ह्यात कलेच्या माध्यमातून कुुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारे सुमारे १०० ते १५० कलांवत आहे़ कलावंताना एकत्र येण्यासाठी कलामंथन गु्रप तयार केला आहे़ शासनाने नाट्यप्रेमी व कलावतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी धुळ्यात नाट्यमंदिर निर्माण केले आहे़ मात्र नाट्यमंदिर व्यावसायिक झाले आहे़ त्यामुळे कलावंतांना भाडे परवडत नाही़ त्यामुळे कलावंताना व्यासपीठ मिळत नाही़क्रीडापटूंचा गौरवधुळे : महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त तायक्वांदोपटू निरज दिलीप चौधरी आणि कोच प्रविण बोरसे यांना शनिवारी कल्याण भवनात धुळे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले़ तसेच राष्ट्रीय खेळाडू समृध्दी दरवाडे, राज्यस्तरीय खेळाडू प्रेरणा जगताप, दिव्या जाधव, वृंदाराज शिरके, उन्नती चव्हाण, प्रणव नाचरे, जितू पाटील, दर्शन पाटील, अश्लेषा जोशी, गितांजली ईशी, देवयानी मोरे, हर्षाली विसपुते, आदी खेळाडूंचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे