कारोना रुग्णालयात रोटेशन पध्दतीने ड्युटी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST2021-04-21T04:35:35+5:302021-04-21T04:35:35+5:30

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात रोटेशन पध्दतीने कोविडची ड्युटी लावावी, अशी मागणी रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी केली आहे. याबाबत परिचारिकांनी राज्याचे ...

Do the rotation duty at Carona Hospital | कारोना रुग्णालयात रोटेशन पध्दतीने ड्युटी लावा

कारोना रुग्णालयात रोटेशन पध्दतीने ड्युटी लावा

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात रोटेशन पध्दतीने कोविडची ड्युटी लावावी, अशी मागणी रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी केली आहे. याबाबत परिचारिकांनी राज्याचे आरोग्यमंत्री, आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आंतररुग्ण विभाग प्रमुख, सहायक अधिसेविका तसेच परिचारिका संघटना आदींना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून आम्ही आंतररुग्ण विभागात सेवा बजावत आहोत. त्यामुळे अनेक परिचारिकांना कोरोनाची लागण झाली. शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाचा त्रास सहन करावा लागला. काही परिचारिकांना अस्तमाचा त्रास असल्याने जास्त वेळ मास्क लावून सेवा बजावणे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. इतर शासकीय रुग्णालयांप्रमाणे जिल्हा रुग्णालयात रोटेशन पध्दतीने ड्युटी दिली जात नाही. आतापर्यंत कोविडच्या आंतररुग्ण विभागात सेवा बजावणाऱ्या परिचारिकांना आता बाह्यरुग्ण विभागात रोटेशन प्रमाणे सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर अधिपरिचारिका संगिता चव्हाण, सुरेखा निकम, जयश्री पाटील, भावना सोनवणे, मीनाक्षी परदेशी, विजया शिंदे, मयुरी सोमवंशी, शोभा कांबळे, सुमित गांगुर्डे, गाैरी सुतार, काैशल्या राठोड, सिमा साळोखे, प्रीती कोळी, शितल थोरात, शोभा कांबळे, शितल मनगुसकर, चंद्रमुखी पवार, प्रणाली सोनवणे, सचिन कुंभार आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Do the rotation duty at Carona Hospital