शेड व बैठक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:58+5:302021-04-16T04:36:58+5:30

सुमारे वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. अशा परिस्थितीत चक्करबर्डी परिसरात असलेले हिरे ...

Direct inspection of sheds and seating arrangements | शेड व बैठक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी

शेड व बैठक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी

सुमारे वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. अशा परिस्थितीत चक्करबर्डी परिसरात असलेले हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेली गट नंबर २०५ येथील स्वमालकीची जागा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी धुळे महापालिकेस उपलब्ध करुन दिली. या वर्षभराच्या काळात शहरासह संपूर्ण ग्रामीण भाग तसेच जळगाव, नंदुरबार, मालेगाव येथील सुमारे ६५० मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सद्यस्थितीत कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीबद्दलची नातलगांना असलेली भीती कमी झाल्याने अंत्यसंस्काराला नागरिक पुढे येऊ लागले आहे. परिणामी या स्मशानभुमीत नातलगांना ताटकळत राहू नये व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेमार्फत तेथे दोन ओटे, नातेवाईकांना बसण्यासाठी शेड व बैठक व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था करण्यात येत आहे.

८ दिवसात काम पूर्ण

जागेचे सपाटीकरण, पाणी व्यवस्था, स्वच्छतेचे सुरु झाले आहे. ८ दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Direct inspection of sheds and seating arrangements