शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे ते मुंबई पदमोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST

रामानंदचार्य यांचा जन्मोत्सव साजरा धुळे : जगद‌्गुरू स्वामी श्री रामानंदाचार्य महाराज यांच्या ७२१ व्या जन्मोत्सवानिमित्त वैष्णव बैरागी युवा विकास ...

रामानंदचार्य यांचा जन्मोत्सव साजरा

धुळे : जगद‌्गुरू स्वामी श्री रामानंदाचार्य महाराज यांच्या ७२१ व्या जन्मोत्सवानिमित्त वैष्णव बैरागी युवा विकास फाउंडेशनच्या धुळे जिल्ह्याच्यावतीने धुळे येथील गणपुले दत्त मंदिर येथे गुरुवारी महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेखा हिरालाल बैरागी, प्रदीप बैरागी ,सिद्धांत बैरागी, भूषण बैरागी, भरत शंकरदास बैरागी, नकुल बैरागी, धर्मदास वैष्णव, चेतन बैरागी, शिवचरण मुरलीधरदास बैरागी, संजय केशवदास बैरागी, गुड्डू केशवदास बैरागी, भिकादास बैरागी, सौरभ बैरागी,चेतन बैरागी उपस्थित होते.

अनिता पाटील यांना पीएच.डी. प्रदान

धुळे : झेड.बी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.अनितादेवी पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सेवानिवृत्त प्राचार्य डॅा. ए.पी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्या एन.सी. पाटील यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.

सरपंचपद निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा

धुळे : जिल्ह्यात नुकत्याच २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून, सर्वच गावांचे आरक्षणही जाहीर झालेले आहेत. त्यामुळे आता सरपंचपदाचा कार्यक्रम जाहीर होण्याची नवनिर्वाचित सदस्यांना प्रतीक्षा आहे. तर प्रवर्गानिहाय निघालेल्या आरक्षणानुसार सरपंचपदाची संधी कोणाला मिळते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

कवी कट्ट्यातर्फे काव्यस्पर्धेचे आयोजन

धुळे : कवयित्री बहिणाबाई चौधरी कवी कट्ट्यातर्फे अहिराणी भाषिक काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कविता स्वीकारण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. कविता प्राचार्य डॉ.क.उ. संघवी, शनिमंदिरा जवळ, वाडीभोकर रोड या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आयोजकांनी कळवले आहे.

वाहतूक सिग्नल सुरू करण्याची गरज

धुळे : शहरातील संतोषी माता मंदिर चौक व कमलाबाई कन्याशाळा चौकात वाहतूक सिग्नल लावले असून ते सुरू करण्याची मागणी आहे.