शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:31 IST

माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपानंतर खोली क्रमांक १०२ उघडली अन्...

धुळे : येथील शासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या आमदारांच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत साडे पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा उद्धव सेनेचे नेते अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशीरा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एक कमिटीने या रुमचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी केली.

रुममध्ये नोटा मोजण्याचे मशिन देखील नेण्यात आले होते. एक तासहून अधिक वेळ रुममध्ये सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू होती, असे समजते. मात्र, रुममधून कुणीही बाहेर न आल्याने यासंदर्भात दुजोरा मिळालेला नाही.

धुळ्यात बुधवारी सकाळी समितीचे ११ आमदार दाखल झाले आहेत. या समितीत सहभागी असलेल्या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत असा आरोप बंद खोलीबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमासमोर केला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. आर. पाटील, उद्धव सेनेचे नरेंद्र परदेशी आणि कॅमेरामन माळी अशा पाच लोकांच्या कमिटीने रुमचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी सुरु केली. काही वेळानंतर रुममध्ये नोटा मोजण्याचे मशिन नेण्यात आले. एक तासापेक्षा अधिक काळापासून रुममध्ये सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू होती, असे समजते. 

धुळ्यात दौऱ्यावर आलेले आमदार.... -अभ्यास दौऱ्यासाठी २९ लोकप्रतिनिधी २१ मे रोजी धुळ्यात येणार होते. परंतू सोमवारी सकाळी फक्त ११ सदस्य आले. त्यात समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर, आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अवर सचिव (समिती) दामोदर गायकर यांचा समावेश होता.

अनिल गोटे बाहेर बसूनच ...रुममध्ये इन कॅमेरा तपासणी सुरु असताना अनिल गोटे हे रुमच्या बाहेर विश्रामगृहाच्या बाहेर खुर्चीवर बसून होते. त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह त्यांचे समर्थक ठाण मांडून बसले होते. 

तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन... अनिल गोटे सायंकाळी सहापासून आंदोलनाला बसले होते. प्रशासनाची समिती रात्री ११ वाजता शासकीय विश्राम गृहावर आली. त्यानंतर रुममध्ये इन कॅमेरा तपासणी सुरु होती.

टॅग्स :Anil Goteअनिल गोटेDhuleधुळेraidधाड