शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:52 IST

२ लाख ७० हजार ६९५ उतारे ऑनलाईन

धुळे : सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्ह्याने लक्ष्यवेधी कामगिरी बजावली आहे. धुळे जिल्ह्याने नाशिक विभागातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्चअखेर २ लाख ७० हजार ६९५ सातबारा संगणकीरणाचे काम जिल्हाधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा ई-फेरफार प्रकल्पाच्या नोडल अधिकारी  हेमांगी पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन धुळे जिल्ह्यातील ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून धुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारे कामकाज केले आहे. महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सुलभ व्हावे म्हणून महाभूमी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व स:शुल्क आणि नि:शुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. आगामी काळातही धुळे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक कायम राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण केले जातील. महसूल विभागाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. महसूल विभागाच्या  प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी धुळे जिल्ह्यात उल्लेखनीय कामकाज झाले आहे. ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत संगणकीकरणाच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घेतल्याने ही कामगिरी बजावणे शक्य झाले आहे.  - हेमांगी पाटील, नोडल अधिकारी,  ई- फेरफार प्रकल्प.

टॅग्स :Dhuleधुळे