कंत्राटी डाॅक्टर वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:11+5:302021-04-01T04:36:11+5:30

धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी डाॅक्टरांचे वेतन थकल्याने काळ्या फिती लावून कामकाज केले आणि भोजन ...

Deprived of contract doctor salary | कंत्राटी डाॅक्टर वेतनापासून वंचित

कंत्राटी डाॅक्टर वेतनापासून वंचित

धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी डाॅक्टरांचे वेतन थकल्याने काळ्या फिती लावून कामकाज केले आणि भोजन काळात निदर्शने देखील केली.

महाविद्यालयातील ३२ कंत्राटी डाॅक्टरांचे डिसेंबर २०२० पासून तीन महिन्यांचे वेतन थकले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरचे वेतन त्यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात मिळाले तर यापुढील वेतन नेमकी कधी मिळेल याची शाश्वती नाही. शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने वेतन रखडल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

सर्व कंत्राटी डाॅक्टर रुग्णसेवा व वैद्यकीय विद्यार्थींचे प्रशिक्षण अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत असतात. तसेच कोरोना महामारीमध्ये डाॅक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णसेवा केली व अजूनही करत आहेत. परंतु वेतन नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने अनेक कंत्राटी डाॅक्टर याआधीच सोडून गेले आहेत. काहीजण सोडण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत डाॅक्टरांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत कंत्राटी डाॅक्टर सोडून गेले तर रुग्णांवर उपचार करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्वरित वेतन मिळावे अशी मागणी या डाॅक्टरांनी केली आहे. तसेच वेतन मिळेपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Deprived of contract doctor salary