धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी डीडीसी बॅंकेच्या दोघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:33+5:302021-06-10T04:24:33+5:30

धुळे : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या छडवेल ता. साक्री शाखेच्या दोन कर्मचारींविरुध्द निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल ...

Crime against both of DDC Bank for hurting religious sentiments | धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी डीडीसी बॅंकेच्या दोघांविरुध्द गुन्हा

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी डीडीसी बॅंकेच्या दोघांविरुध्द गुन्हा

धुळे : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या छडवेल ता. साक्री शाखेच्या दोन कर्मचारींविरुध्द निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

छडवेल गावात शिवाजी चाैकामध्ये असलेल्या डीडीसी बॅंकेच्या शाखेत ३ मे २०२१ ते ८ जून २०२१ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत दादाजी दाैलतराव अहिरराव (४७, रा. छडवेल, ह. कु. रामदेवबाबानगर, प्लाॅट क्रमांक ३५, नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवाच्या फोटोची चुकीच्या पध्दतीने हाताळणी करुन श्रध्दांचा अवमान केला. बुध्दीपुरस्सर आणि दुष्ट हेतून समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चुकीची कृती केली.

या फिर्यादीवरुन बॅंकेचे कनिष्ठ अधिकारी नामदेव वंजी बच्छाव (रा. निजामपूर), लिपिक प्रविण उत्तम घरटे (रा. सामोडे ता. साक्री) या दोघांविरुध्द मंगळवारी सायंकाळी निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९५ अ, १५३ क, १०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलसी उपनिरीक्षक सुनील वसावे करीत आहेत.

Web Title: Crime against both of DDC Bank for hurting religious sentiments