शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना थांबेना, रुग्ण आढळणे सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:29 IST

भुषण चिंचोरे धुळे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली ...

भुषण चिंचोरेधुळे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सप्टेंबरनंतर रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. मात्र आता पुन्हा रुग्णांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. दररोज सरासरी २० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. मागील मंगळवारी तर एकाच दिवशी ४४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र पुन्हा गुरुवारी २० रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा दोनशे पार जाण्याची चिन्हे आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या म्हणजेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५० पार गेली आहे. मागील दोन महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली होती, मात्र आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. धुळे शहरात जास्त रुग्ण आहेत, तर साक्री तालुक्यात उपचार घेत असलेले सर्वांत कमी कोरोनाचे रुग्ण आहेत.जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६३ इतकी झाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी रुग्णांची संख्या १८४ इतकी होती. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा विस्फोट झाला होता. त्यावेळी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाली होती. मात्र त्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पेक्षा कमी झाली होती. दरम्यान, धुळे शहरातील रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६६ टक्के रुग्ण धुळे शहरातील आहेत. धुळे शहरात सुरुवातीपासूनच उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त राहिली आहे. जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या १६३ रुग्णांपैकी १०९ सक्रिय रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. सर्व तालुक्यातील रुग्णांची संख्या मात्र ५०पेक्षा कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. साक्री तालुक्यात सर्वांत कमी रुग्ण आहेत. धुळे तालुक्यात २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुक्यातील १२, शिंदखेडा १० व साक्री तालुक्यातील ६ जण उपचार घेत आहेत. शिरपूर तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली होती. तेथील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ दोन इतकी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यात सध्या १२ रुग्ण आहेत.