शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या पेपरला सर्वत्र कॉपीचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:42 IST

धुळे जिल्हा : ६३ केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू, ३१ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ट, भरारी पथकांच्या वेगवेगळ्या केंद्रांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात झाली. मराठीच्या पेपरला शहरासह ग्रामीण भागातील काही केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेला पहिल्याच दिवशी हरताळ फासला गेला. दरम्यान मराठीच्या पेपरला न्याहळोद येथील केंद्रावर कॉपी करतांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने एका विद्यार्थ्याला पकडले.दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३१ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ६३ केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे.दहावाजेपासूनच गर्दीदहावी बोर्डाचा पहिलाच पेपर असल्याने, मंगळवारी सकाळी दहा-सव्वादहा वाजेपासूनच परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. केंद्रात आल्यावर अनेक विद्यार्थी आपला नंबर कोणत्या वर्गात आहे, याची चाचपणी करतांना दिसून येत होते.प्रवेशद्वाराजवळच तपासणीपरीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वीच प्रवेशद्वाराजवळच शिक्षकांकडून सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनींची कसून तपासणी करण्यात येत होती. परीक्षार्थिंनी आणलेल्या बॅगाही तपासण्यात येत होत्या.१०.५० वाजताप्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातीपरीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.शहरातही कॉपीचे प्रकार घडलेकॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. असे असतांनाही शहरातील मील परिसर, देवपूर परिसर, वलवाडी भागात असलेल्या परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपीचे प्रकार घडले.मील परिसरात असलेल्या केंद्रावर कॉपी पुरविणाºया तिघांना पोलिसांनी पकडले. थोडा ‘प्रसाद’ दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. देवपूर भागातही दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कॉपी पुरविणाºयांच्या गोंगाटाचा इतर परिक्षार्थींना त्रास सहन करावा लागला.दरम्यान जिल्ह्यातील काही केंद्रावर भरारी पथकाने भेटी दिल्याचे सांगण्यात आले.गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये जातीने लक्ष दिले होते़ त्यांनी स्वत:चे भरारी पथक तयार करुन प्रत्येक पेपरला एका केंद्राला भेट देण्याचा सपाटा लावाला होता़ काही संवेदनशिल केंद्रांवर तीन तास ठिय्या मांडला होता़ तसेच परीक्षार्थी कॉपी करणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या़परंतु यंदा मात्र बारावीच्या परीक्षेत आलबेल होते तसेच दहावीच्या परीक्षेतही दिसते आहे़ आता उर्वरित पेपर तरी कॉपीमुक्त होणार का असा प्रश्न काही सुज्ञ पालकांनी उपस्थित केलेला आहे.तर यापुढे कॉपी प्रकार थांबवला जाईल असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Dhuleधुळे