शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेच्या महासभेत भूसंपादनाचा वादग्रस्त विषय अखेर तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 21:11 IST

अजेंड्यावरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक, आॅनलाईन महासभेतील वास्तव, नगरसेवकांनी मांडल्या समस्या

धुळे : शहरातील सर्व्हे नंबर ४८३ मधील शंभर फुटी रस्त्याच्या विकास योजनेत भूसंपादन करण्याविषयी महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला विषय अखेर तहकूब करण्यात आला. स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी यापुर्वीच महापौर आणि आयुक्तांना पत्र देवून हा विषय मंजूर करु नये अशी मागणी केली होती. महासभेत सभापती बैसाणे यांच्या गैरहजेरीत नगरसेवक शितल नवले यांनी प्रशासनाला धारेवर धरत वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट विषय सादर करुन आम्हाला अडचणीत आणू नये असे सांगत आक्षेप नोंदविला. अखेर महापौर चंद्रकांत सोनार यांनी हा विषय तहकूब केला. दरम्यान, सभेच्या सुरुवातीलाच अजेंड्यावरील विषय घ्यायचे की नंतर घ्यायचे यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते.महापालिकेच्या सभागृहात महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन महासभा पार पडली. यावेळी आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह विरोधी पक्षनेते साबीर शेख, प्रदीप कर्पे, अमोल मासुळे, संजय पाटील, प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, अमीन पटेल, शितल नवले, वंदना भामरे, कमलेश देवरे, किरण अहिरराव यांच्यासह १० ते १५ नगरसेवक प्रत्यक्षात सभागृहात हजर होते. तर, बाकीचे आॅनलाईन सहभागी झाले होते.शेवटून विषय घेण्याचीमागणी फेटाळलीसभेच्या सुरुवातीला नगरसेवक संजय पाटील यांनी महासभेतील विषय पत्रिकेतील विषय खालून वर या उलट्या क्रमवारीने सभेत घ्यावे अशी मागणी केली. अत्यंत महत्वाचे, धोरणात्मक विकासाचे आणि आर्थिक विषय शेवटी टाकून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. या विषयाला शितल नवले यांनी साथ दिली. मात्र महापौरांनी या मागणीला नकार देत क्रमाने विषय घेतले जाईल असे सांगत सभेतून कोणीही अधिकाऱ्यांनी जावू नये असे आदेश काढले.अजेंड्यावरुन आमने-सामनेसाबीर शेख यांनी पाणी आणि स्वच्छता यावर सभेच्या सुरुवातीला प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. पण, अजेंड्यावरील विषय घ्या, नंतरचे विषय शेवटी घेण्यात यावे अशी मागणी केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने आले. शितल नवले आणि शाबीर शेख यांच्यात कलगीतुरा रंगल्याने वाद मिटविण्यासाठी अमोल मासुळे, देवेंद्र सोनार, प्रदीप कर्पे यांनी वाद मिटविला.इतिवृत्त मिळावेकोणत्याही सभेचे इतिवृत्त मिळत नाही. आम्ही काय बोलतो, प्रत्यक्षात काय लिहिले जाते याची माहिती आम्हाला मिळावी अशी मागणी नगरसेवक हर्ष रेलन यांनी महापौरांकडे केली. त्यामुळे पुढील सभेपासून इतिवृत्त देण्याचे महापौरांनी मान्य केले. त्याची अंमलबजावणी होणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे