शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धुळ्याच्या सीईओंनी भेट नाकारल्याने अनुकंपाधारक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:50 PM

४० अनुकंपाधारकांच्या कागदपत्रांची तपासणी होऊनही सेवेत समावून घेण्यात आलेले नाही

आॅनलाइन लोकमतधुळे :अनुकंपधारकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत समावून घेण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, तरीही गेल्या सात महिन्यापासून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेत आपले म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या ४० अनुकंपधारकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट नाकारल्याने, अनुकंपाधारक संतप्त झाले. मात्र एका राजकीय पदाधिकाऱ्याने त्यांची समजूत काढल्याने, अनुकंपाधारक माघारी फिरले.जिल्ह्यातील अनुकंपाधारक गेल्या ८- ते १० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वित्त विभागाच्या ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध आहे, आणि ज्या पदाच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा सरळसेवेच्या कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत गट-क व गट-ड मधील प्रतीवर्षी रिक्त होणाºया पदाच्या २० टक्के पदे ही अनुकंपाधारकांना देण्याचे शासनाचे आदेश आहेत. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या ४ फेब्रुवारी २०२०च्या पत्रानुसार अनुकंपाधारकांना ४५ दिवसाच्या आत नियुक्ती देण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्याप काही कार्यवाही झालेली नाही.राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र दिले आहेत. मात्र धुळे जिल्हा परिषदेने अनुकंपधारकांना अद्याप सेवेत समावून घेतलेले नाही. दरम्यान या अनुकंपधारकांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच घराची पाहणी फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आलेली आहे. असे असतांनाही अनुकंपधारकांना सेवेत समावून घेण्यात आलेले नाही.दरम्यान या संदर्भात जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० अनुकंपाधारक आज जिल्हा परिषदेत सकाळी १० वाजताच दाखल झाले. या अनुकंपधारकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांची भेट घेण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. मात्र सीईओंनी त्यांना भेट दिली नाही असे या अनुकंपधारकांचे म्हणणे होते. सीईओंनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांना भेटण्यास सांगितले. मात्र ते नसल्याने, अनुकंपधारकांना त्यांची भेट घेता आली नाही.दरम्यान राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसेल यांनी या अनुकंपधारकांची समजूत काढली. त्यानंतर हे अनुकंपाधारक माघारी फिरले. दरम्यान या अनुकंपधारकांनी प्रशासनाला निवेदन देवून तत्काळ अनुकंपाचे नियुक्ती पत्र देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे