शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा रंग आणि डिझाईनवरुन लुटीच्या आरोपीला केले गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 22:54 IST

धुळयातील घटना : अमळनेरच्या व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी पोलिसांची कामगिरी

धुळे : अमळनेर येथील व्यापाºयाला लूटल्याच्या घटनेतील संशयितांच्या दुचाकीचा रंग आणि त्यावरील डिझाईन यावरुन आझादनगर पोलिसांना मोहाडीतून एका संशयिताला अटक करण्यात यश आले. त्याला न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली़अमळनेर येथील व्यापारी जैनुद्दीन शेख पुणे जाण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धुळे शहराजवळ पारोळा चौफुलीवर उभे होते. अंधाराचा फायदा घेऊन तीन जण दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी जैनुद्दीन शेख यांना धमकाविले. नंतर ते लुटारु व्यापाºयाकडील ३५ हजार रुपये रोख आणि मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. घटनेनंतर व्यापाºयाने आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती कथन केली़ त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे अज्ञात लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला.सुरुवातीला पोलिसांनी माहितीच्या आधारावर स्केच काढून तपास करण्याचा प्रयत्न केला़ पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ शेवटी चर्चेतून दुचाकी कोणती, कोणत्या रंगाची आणि त्याच्यावर असलेली डिझाईन या प्रकारे सुक्ष्म माहितीचा आधार घेण्यात आला़ पोलिस पथकाने वरखेडी, फागणे, वणी, बाळापूर, वडजाई, सौंदाणे व मोहाडी परिसरात कसून तपास सुरु होता. परंतू यश हाती लागत नव्हते. तेव्हा पोलिसांनी फिर्यादीने लुटीला आलेले तरुण हे ज्या मोटारसायकलवर आले होते. त्याचा रंग आणि नंबर प्लेटवर असलेले डिझाईनसंदर्भात दिलेल्या माहितीचा आधार घेऊन तशाप्रकारच्या मोटारसायकलचा तपास सुरु केला. तशा संशयित १५ ते २० मोटारसायकलस्वारांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा शेवटी मोहाडीतील विजय भगवान पाटील (२१) या संशयिताची ओळख पटली. तेव्हा आझादनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले़ त्याचे अन्य दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत़संशयित विजय पाटील याला न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविली आहे.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार सैय्यद, हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कर्मचारी रमेश माळी, सुनील पाथरवट, संजय भोई, शोएब बेग, अतिक शेख यांनी पार पाडली.आझादनगर पोलिसांनी पकडलेल्या संशयिताची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही़ त्याच्यावर कोणतेही गुन्हे असल्याचे रेकॉर्ड नाही़ असे असताना अतिशय कुशलतेने त्याला पकडण्यात आले आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी