शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बसस्थानक झाले ‘डबक्यां’चे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:36 IST

धुळे : जागोजागी पडलेल्या खड्यांमध्ये साचले पाणी, प्रवाशांना स्थानकाच्या आवारात चालणे कठीण, अधिकायांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या काही दिवसांपासून पासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातील खड्यांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे हे जिल्ह्याचे बसस्थानक आहे की ‘डबक्यां’चे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. खड्डे बुजविण्याची तसदीही एस.टी. महामंडळातर्फे घेतली जात नसल्याचे प्रवाशांची ओरड आहे. तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानकात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हजार पेक्षा बसगाड्या येतात व जातात. त्याद्वारे हजारो प्रवाशी या ठिकाणाहून प्रवास करतात. या स्थानकात उतरतात. दिवसभर प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बसस्थानकात सुविधांची वानवा आहे. स्थानकाच्या आवारात धड डांबरीकरणही नाही याचा प्रत्यय प्रवाशांना येऊ लागला आहे. बसस्थानकाच्या आवारातील खडी उखडल्याने, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. येथे बसपोर्ट होईल म्हणून अनेक वर्षांपासून स्थानकाच्या आवारात डांबरीकरणही करण्यात आलेले नाही. मध्यंतरी या स्थानकाच्या आवारात पडलेल्या खड्यांमध्ये जुन्या बांधकामाचे साहित्य टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो केवळ दिखावूपणा होता असे प्रवाशांचे म्हणणे आहे.मुंबई, कोकण परिसरात अतिवृष्टी होत आहे, त्यामानाने धुळ्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र पडत असलेल्या पावसामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील खड्डयांमध्ये जागोजागी पाणी भरले आहे. त्यामुळे हे जिल्ह्याचे बसस्थानक आहे की, डबक्यांचे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे. प्रवाशांच्या अंगावर उडते पाणीस्थानकात येणाºया बसेस अतिशय भरधाव वेगाने येत असतात. खड्यांमधील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते याचे भान चालकांना नसते. त्यामुळे प्रवाशांचेच कपडे खराब होत असतात. स्थानकात जागोजागी खड्डे पडल्याने, प्रवाशांना धड चालता येत नाही, अशी स्थिती आहे.  बसपोर्ट होईल तेव्हा होईल मात्र मध्यवर्ती बसस्थाकाच्या आवारातील खड्डे तर बुजवायला पाहिजे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या आवारात डांबरीकरण केलेले असते, परंतु जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकात डांबरीकरण होऊ नये ही आश्चर्याची बाब आहे. बसस्थानकाचा आवार खड्डेमुक्त करावा. याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे. पेव्हर ब्लॉक बसवावेतस्थानकात प्रवेश करण्याची सुरूवातच खड्डयाने होत असतो. बाहेरगावाहून येणाºया बसगाड्या ज्या दिशेने येतात, तेथे मोठा खड्डा पडला आहे. त्याचबरोबर बस बाहेर पडण्याच्या दिशेलाही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. डांबरीकरण काही वर्षांने निघून जाते. यावर पर्याय म्हणून स्थानकाच्या संपूर्ण आवारात पेव्हर ब्लॉक बसवावेत. म्हणजे बसस्थानक ‘खड्डेमुक्त’ होण्यास मदत मिळेल.

टॅग्स :Dhuleधुळे