धुळ्यातील हिरे महाविद्यालयासाठी बससेवा सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:07 PM2020-09-07T12:07:37+5:302020-09-07T12:07:58+5:30

भाजप कामगार आघाडीचे विभाग नियंत्रकांना निवेदन

Bus service should be started for Diamond College in Dhule | धुळ्यातील हिरे महाविद्यालयासाठी बससेवा सुरू करावी

धुळ्यातील हिरे महाविद्यालयासाठी बससेवा सुरू करावी

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे :हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी परिवहन महामंडळाने बससेवा सुरू करावी अशी मागणी भाजपा कामगार आघाडीतर्फे विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत आरोग्याची सेवा देणाऱ्या तसेच हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांना व रूग्णांच्या नातेवाईकांना पोहचण्यास अडचणी येत आहेत. खाजगी वाहनधारक मनमानीप्रमाणे भाडे आकारतात. सर्वांनाच जादा भाडे देणे शक्य नाही. त्यामुळे महामंडळाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी स्वतंत्र बस सुरू करावी. देवपूर बसस्थानक, वीर सावरकर पुतळा, संतोषी माता चौक, मोबाईल, सुरत बायपास, जवाहर फाऊंडेशन पासून हिरे वैद्यकीय महाविद्यालय असा बसचा मार्ग असावा.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी विजय पवार, सुरज अहिरराव किशोर जाधव, दीपक डंगारे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Bus service should be started for Diamond College in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे