शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे घरफोडी, दुसरीकडे प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:41 IST

चोरट्याच्या दगडफेकीत एक जखमी : देवपुरातील नागरीकांमध्ये भीती

धुळे : शहरातील देवपूर भागात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे उच्छाद मांडला़ एका घरफोडीत चोरट्यांच्या हाती दीड लाखांचा ऐवज लागला़ दुसऱ्या घरफोडीत मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला़ यात चोरट्यांनीच दगडफेक केल्याने घरात एकास दुखापत झाली़ या घटनेनंतर देवपुर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ दरम्यान, आरडाओरड झाल्याने चोरट्यांनी धूम ठोकली़देवपुरातील जुन्या आग्रा रोडवर जीटीपी कॉलनीपासून जवळच असलेल्या गितांजली सोसायटीत आनंद दिवान पवार हे त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात़ खालच्या मजल्यावर सुनील बन्सीलाल भामरे हे भाडेकरु म्हणून राहतात़ ते एका कंपनीत नोकरीला आहेत़ कंपनीच्या कामांनिमित्त ते बारामती येथे गेले होते़ त्यामुळे घरात त्यांची पत्नी आणि मुलगी होती़ मुले आणि पत्नी बेडरुममध्ये झोपलेले असताना चोरट्यांनी सुनील भामरे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची ग्रिल काढून घरात प्रवेश केला़ चोरट्यांनी घरातील २२ हजाराची रोकड, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला़ सकाळी चोरीची ही माहिती मिळताच देवपूर पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ श्वानाने कुंभार गुरुजी शाळेपासून हायवेपर्यंतचा माग काढला़चोरीची दुसरी घटना जीटीपी कॉलनीत घडली़ प्लॉट नंबर २५ अ येथे माणिक बोरसे हे ट्रक व्यावसायिक राहतात़ त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या रुममध्ये प्रफुल्ल अशोक पाटील (४५) हे भाडेकरी म्हणून राहतात़ मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता प्रफुल्ल पाटील यांच्या घराच्या मागील खिडकीचा गज वाकवून चोरट्यांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला़ मात्र, खिडकीचा गज वाकविताना आवाज आल्याने पाटील हे झोपेतून जागे झाले़ त्यांनी लाईट लावून चोरट्यांवर प्रकाशझोत टाकला़ परिणामी पाटील यांच्यावर चोरट्यांनी दगडफेक केली़ यात पाटील यांना दुखापत झाली आहे़ पाटील यांनी केलेल्या आरडाओरडमुळे चोरट्यांनी धूम ठोकली़ यावेळी चोरट्यांनी घाबरुन त्यांच्या दारापुढे चोरलेले दीड ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि चाव्यांचा गुच्छ तेथेच सोडून चोरटे पळून गेले़ बहुधा हे दागिने गितांजली कॉलनीतील घरफोडीचे असावेत असा अंदाज आहे़दरम्यान, या घटनेनंतर देवपुरातील कॉलनी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ घटनेची नोंद देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु झाले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे