शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बोराडीतील पडीक घरातून दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:16 IST

५४ हजारांचा मुद्देमाल : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

शिरपूर : बोराडी येथील एका पडीक घरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून दारु बनविण्याचे साहित्य आणि बेकायदेशीर दारु असा एकूण ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे़धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील गल्ली क्रमांक १ लालबहादूर शास्त्री नगर येथील एका झोपडी वजा पडीत असलेल्या घरात देशी-विदेशी दारु असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली़ माहिती मिळताच पथकाने त्या झोपडीवजा घरात गुरुवारी छापा टाकला़ या ठिकाणी बेकायदेशीर देशी आणि विदेशी दारु बनविण्याचे साहित्यांमध्ये लोखंडी सिलींग मशिन, हॅण्डमेड, स्पिरीटने भरलेले प्लॅस्टिकचे ड्रम, इतर बनावट मद्य बनविण्याकरीता लागणारे साहित्य असा एकूण ५३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ घटनास्थळी अजय विश्वास पावरा (२२, रा़ बोराडी, ता़शिरपूर) याला संशयावरुन अटक करण्यात आली आहे़ ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालक प्राजक्ता लवंगारे - वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या नेतृत्वाखाली आय़ एऩ वाघ, एस़ आऱ नजन, व्ही़ बी़ पवार, सूर्यवंशी, बी़ एस़ महाडीक, डी़ के़ क्षिरसागर, के़ एऩ गायकवाड, एऩ एम़ सोनवणे, आऱ जे़ जाधव, एम़ पी़ पवार, ए़ बी़ निकुंभे, गोयेकर, जवान अमोद भडागे, के़ एम़ गोसावी, प्रशांत बोरसे, जी़ व्ही़ पाटील, केतन जाधव, कपिल ठाकूर, किरण वराडे, जे़ बी़ फुलपगारे, के़ ए़ नागरे, आऱ बी़ शेडगे, विजय नाहीदे, निलेश मोरे, आऱ एम़ देसले, आऱ बी़ चौरे यांनी कारवाई केली़ एस़ आऱ नजन घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे