पिंपळनेर (धुळे): ज्या मांडवात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि दोन कुटुंबे रेशीमगाठीत अडकणार होती, तिथेच क्षुल्लक वादातून रक्ताचा सडा पडला. व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन नवरदेवाकडील नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात साक्री येथील बाप-लेकासह तिघांचा करुण अंत झाला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. मात्र, लग्नापूर्वीच नवरदेवाकडील काही तरुणांनी सोशल मीडियावर "तुमचे अस्तित्व संपवू" अशा आशयाचे चिथावणीखोर स्टेटस आणि रील्स अपलोड केले होते. गुरुवारी सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रमात या स्टेटसवरून दोन्ही पक्षांत वाद झाला. यात सुरेश गोसावी (५०) आणि त्यांचा मुलगा साहिल (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच देवेंद्र पवार (३०) या तरुणालाही आपले प्राण गमवावे लागले.
आरोपींच्या घाटात आवळल्या मुसक्या
घटनेनंतर आरोपींनी कारने गुजरातच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत नाकाबंदी केली आणि गुजरात सीमेवरील ओटाबारी घाटात पाठलाग करून तिघांना अटक केली. यात कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) यांचा समावेश आहे. एका सोशल मीडिया स्टेटससाठी तीन संसार उद्ध्वस्त झाल्यानेतीव्र संताप व्यक्त होत आहे.
Web Summary : A wedding celebration in Pimpalner turned tragic after a WhatsApp status dispute escalated, resulting in the deaths of a father, son, and another man. Relatives of the groom attacked, leading to arrests near the Gujarat border. The incident highlights the devastating consequences of social media-fueled conflict.
Web Summary : पिंपलनेर में व्हाट्सएप स्टेटस विवाद के बाद शादी समारोह दुखद हो गया, जिसमें एक पिता, पुत्र और एक अन्य व्यक्ति की मौत हो गई। दूल्हे के रिश्तेदारों ने हमला किया, जिससे गुजरात सीमा के पास गिरफ्तारियां हुईं। घटना सोशल मीडिया से प्रेरित संघर्ष के विनाशकारी परिणामों को दर्शाती है।