शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यात ‘भोंगऱ्या’ बाजाराला उत्साहात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:13 IST

मोठ्या ढोलच्या तालावर आदिवासी बांधवांनी मनसोक्त केले नृत्य, बाजारात झाली लाखोंची उलाढाल

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : आदिवासी बांधवासाठी पर्वणी असलेल्या भोंगºया बाजाराला तालुक्यातील सुळे येथुन मंगळवारी जल्लोषात सुरूवात झाली़ लोकगीत गायन, बासरी व ढोलच्या आवाजात नृत्य करीत जल्लोषात हा उत्सव साजरा झाला. मोठ्या ढोलच्या तालावर ठेका धरत आदिवासी स्त्री-पुरूष नाचण्यात मग्न होती़ दरम्यान या बाजारात १२-१५ लाखाहून अधिक उलाढाल झाली.३ मार्च रोजी सुळे व आंबा गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. याशिवाय मध्यप्रदेशातील रोसर, पलसुद, नागलवाडी, मंडवाडा, चाचरीया व बाबदड येथेही भोंगºया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला़ बाजाराच्या दिवशीच हा भोंगºया बाजार भरतो. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. तरूणांमधील सळसळता उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन या भोंगºया बाजारातून घडले.सकाळपासून दाखलसकाळपासूनच परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. दुपारनंतर बाजारात गर्दी उसळली होती.पोशाखाने लक्ष वेधलेतरुण-तरुणींनी खास आदिवासी पोशाख, काहींनी कमरेभोवती आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. पारंपरिक आदिवासी गितांसह काही हिंदी चित्रपटांच्या गीतांची धुनही आपल्या बासरीतून वाजवित होते.नृत्य करून आनंद लुटलाआदिवासी बांधवांनी गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. भोंगºया बाजार पाहाण्यासाठी खास बाहेरगावाहून आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली़गर्दीने फुलले रस्तेआदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी येथील विक्रेत्यांकडे गर्दी केली होती. त्यामुळे नेहमीच्या आठवडे बाजारापेक्षा आज मात्र इतर दिवसांपेक्षा बाजार अधिक फुलला होता. सर्वच रस्ते गर्दीने फुललेले दिसत होते. होळी सणांसाठी लागणारा सामान व साहित्यांची खरेदी आदिवासी बांधव करत होते. होळीच्या दिवशी प्रसाद म्हणून लागणारे दाळ्या, फुटाणे, साखरेचे कंगणहार विक्रेत्यांकडून घेत होते. दरम्यान तालुक्यात आता आठवडाभर भोंगºया बाजाराचा उत्साह बघावयास मिळणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे