सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 12:58 IST2021-04-19T12:58:08+5:302021-04-19T12:58:25+5:30

तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर होते फरार

Assistant Inspector of Police Punjabrao Rathore dies due to corona | सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचे कोरोनामुळे निधन

सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचे कोरोनामुळे निधन

धुळे : दोंडाईचा येथील सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचे कोरोनामुळे पहाटे निधन झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सकाळपासून सुरु आहे़ या वृत्ताला पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी देखील दुजोरा दिला़
दोंडाईचा येथील मोहन मराठे याच्या संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले़ यात सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांना जबाबदार धरण्यात आले़ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्या क्षणापासून राठोड हे फरार होते़ दरम्यानच्या काळात हे प्रकरण सीआयडीकडे पुढील तपासासाठी पाठविण्यात आले असल्याने तपास सीआयडी करीत आहेत़ राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पिंपळनेर पोलीस ठाण्यात काम केले आहे़ त्यांच्या कार्यकाळात राईनपाडा हत्याकांड देखील घडले होते़ हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे़

Web Title: Assistant Inspector of Police Punjabrao Rathore dies due to corona