शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

जाविद खाटीक खुनातील आरोपींना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील जाविद खाटीक यांच्या खून प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : येथील जाविद खाटीक यांच्या खून प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत राज्य मुस्लीम खाटीक सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच खाटीक यांच्या नातलगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नुकतीच निदर्शने केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ८ जुलै रोजी रात्री ही घटना घडली. जाविद रज्जाक खाटीक (रा. शनि मंदिराजवळ, जळगाव) हे जळगाव येथून पिकअप गाडीत बोकड भरून कल्याणला जात असताना धुळे-मालेगावच्या दरम्यान तीन ते चार गुंडांनी त्यांचे वाहन लुटमारीच्या उद्देशाने अडविण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबविली नाही म्हणून या गुंडांनी दुचाकीवरून पाठलाग करीत अंदाधुंद गोळीबार केला. यात जाविद खाटीक यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यानंतर हल्लेखार पसार झाले. जाविद खाटीक यांना धुळे शहरात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई-आग्रा महामार्ग, मालेगाव, चाळीसगाव या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या बोकड व्यावसायिकांवर दरोडेखोर नेहमीच हल्ले करतात. लुटमार व हत्या करतात. त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. तसेच जाविद खाटीक यांचा खून करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ताैसिफ खाटीक, हाजी हुसनोद्दीन, युसूफ खाटीक, हाशिम कुरेशी, इमरान कुरेशी, असलम खाटीक, तरबेज खाटीक, असराफ खाटीक आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.