शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंदाचा ट्रक महामार्गावर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:52 IST

सांजोरी फाटा : हजारो रुपयांचे नुकसान

धुळे : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील सांजोरी फाट्यावर सफरचंद घेऊन जाणारा ट्रक खड्डा असल्यामुळे उलटला़ चालकाच्या दक्षतेमुळे जीवितहानी टळली़ या अपघातात ट्रकसह मालाचे नुकसान झाले आहे़ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या कामाबद्दल सुरुवातीपासूनच तक्रारी होत आहेत़ धुळे तालुक्यातील फागणे ते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या १३४ किमीच्या अंतरात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे म्हणून स्थानिकांनी एकत्र येऊन आंदोलनाचा मार्ग स्विकारला़ शेतकरी संघ या नावाने संघटीत झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलने करीत प्रशासनाला निवेदन देखील दिले आहेत़ संबंधित कंपनीच्या अधिकाºयांनी सुध्दा वेळोवेळी केवळ आश्वासने दिली आहेत़ परिणामी गेल्या ३० आॅक्टोबरला एकाच दिवशी फागणे ते नवापूर दरम्यान चार ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघाने दिला होता़ तथापि, कंपनीच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत १५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते़ त्याचे पुढे काय झाले हाच प्रश्न आहे़ आजही हे खड्डे तसेच असल्याने अपघात होत आहेत़ सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरजे १९ जीजी २३७८ क्रमांकाचा ट्रक गुजरात राज्याकडून सफरचंद घेऊन धुळ्याकडे येत असताना धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावाजवळील सांजोरी फाट्यालगत रस्त्यावर कुठलाही फलक न लावल्याने ट्रक चालकाने वाहन सरळ नेले़ पुढे अचानक रस्ता संपल्याने ट्रक वळवावा लागला़ त्याचवेळी ट्रकचे चाक खड्यात गेल्याने वाहन उलटले़ चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही़ मात्र, ट्रकसह मालाचे नुकसान झाले आहे़ यावेळी वाहन         चालकाकडून संताप व्यक्त करण्यात आला़ अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ दरम्यान, नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघाताची मालिका सुरु असून अनेकदा तक्रारी करुन स्थानिकांची आंदोलने होऊन देखील रस्ता दुरुस्त होत नसल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात