यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता प्रशासनाची आपत्ती नियोजनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:31+5:302021-06-10T04:24:31+5:30

पूरबाधित क्षेत्र जिल्ह्यातील नदीपात्रांजवळील जवळपास ९२ गावांच्या क्षेत्रात नदीचे पाणी गाव व शेतात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्यात फटका ...

After a lot of rain this year, the administration is now preparing for disaster planning after Corona | यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता प्रशासनाची आपत्ती नियोजनाची तयारी

यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता प्रशासनाची आपत्ती नियोजनाची तयारी

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यातील नदीपात्रांजवळील जवळपास ९२ गावांच्या क्षेत्रात नदीचे पाणी गाव व शेतात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्यात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शिरपूर व साक्री तालुक्यांतील काही गावांना अधिक धोका असल्याने अशा भागातील शेतकऱ्यांना २४ तास आधीच सतर्क राहण्याचा इशारादेखील बैठकीत देण्यात आलेला आहे.

कोट

यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्याला पुराचे संकट खूप कमी असते, तरीदेखील आम्ही खबरदारी घेऊन सर्व ते बचाव साहित्य उपलब्ध केले आहे.

संजय यादव उपजिल्हाधिकारी

शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू

शहरातील धोकादायक इमारतींचे महापालिकेने काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्या सुमारे शंभराहून अधिक इमारती जीर्ण झालेल्या आहेत, तर १०५ इमारती अतिधोकादायक आहेत. अशा इमारती खाली करण्यासाठी इमारत मालकांना नोटिसा मनपाकडून बजावण्यात आलेल्या आहेत.

अग्निशमन दल सज्ज

महानगरात, साक्री, शिंदखेडा व शिरपूर अशा चार ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. या दलाकडे अग्निशमन बंबांसह लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत.

Web Title: After a lot of rain this year, the administration is now preparing for disaster planning after Corona