धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:00 IST2025-07-30T16:59:18+5:302025-07-30T17:00:51+5:30
Maharashtra Crime News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धुळ्यातील एका जोडप्याने वशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
Couple Suicide Latest News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या एका जोडप्याने तिथेच स्वतःचे आयुष्य संपवले. धुळे जिल्ह्यातून आलेल्या या तरुण-तरुणीने वशिष्ठी नदीत उडी घेत आत्महत्या केली. चिपळूण शहरातील गांधेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पावसामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य खुलले आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणी बुडत असतानाचे दिसून आल्यानंतर ही घटना समोर आली.
गांधेश्वर मंदिर परिसरात तरुणी बुडत असल्याचे दिसून आले. तिचा पाण्यात बुडतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते धुळे जिल्ह्यातील असून, फिरण्यासाठी कोकणात आले होते.
चिपळूणमध्ये फिरत असताना ते वशिष्ठी नदीकाठी गेले आणि नदीत उड्या मारून आयुष्य संपवले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक घटनास्थळी आले.
दोघांचेही मृतदेह शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. चिपळूण पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, दोघांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.