शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३९ कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:06 IST

गाळमुक्त धरण : मोफत गाळ नेण्याचे प्रशासनाचे शेतकयांना आवाहन

धुळे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांसह पाझर तलाव, बंधारे यांत साठलेला गाळ उपसण्याच्या ३९ कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत काढण्यात येणारा सुपीक गाळ  शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार आहे. शेतकºयांनी या सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. या योजनेसाठी अनुलोम संस्था व टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या सर्वाधिक १६३ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून वनविभागाच्या ९६, कृषी विभागाच्या ६, धुळे पाटबंधारे विभागाच्या १८, लघुसिंंचन (जलसंधारण)च्या १४ व लघुपाटबंधारे विभागाच्या ३ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत ४६ लाख घनमीटर काम होणार आहे. हे काम पाऊस सुरू होईपर्यंत चालणार आहे. अनुलोम संस्था व टाटा ट्रस्ट यांच्यातर्फे धरणांमधील गाळ उपसण्यासाठी जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ११.९२ पैसे घनमीटर असा दर निश्चित करण्यात येऊन डिझेलचा खर्च शासनातर्फे दिला जाणार आहे. विविध विभागांतर्फे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. स्पर्धेतील गावांना प्राधान्य या योजनेंतर्गत सध्या सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शेतकºयांना हा गाळ न्यायचा असेल त्यांनी जलाशयाचे नाव व शेतकºयांची यादी जिल्हा रोहयो शाखेत द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

या योजनेंतर्गत मोठ्या धरणांसह जुन्या पाझर तलावांमधील गाळही काढण्यात येणार आहे. त्या-त्या परिसरातील शेतकयांनी बैलगाडी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा गाळ नेऊन आपल्या शेतात टाकावा, अशी अपेक्षा आहे. गाळ मोफत दिला जाणार आहे. केवळ त्याच्या वाहतुकीचा खर्च शेतकºयांना करावा लागणार आहे. गोविंद दाणेजउपजिल्हाधिकारी, रोहयो

 

टॅग्स :Dhuleधुळे