शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

गाळेधारकांना १०० टक्के सवलतीचे चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:22 PM

महापालिका : गुरूवारी होणार पाहिला टप्पा पूर्ण

धुळे : मालमत्ता कर सवलतीप्रमाणे व्यवसायिकांना देखील करात सवलत मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून अभय योजना लागु करण्यात आली आहे़ त्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या चार दिवसात गाळेधारकांना या योजनेतून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे़ त्यामुळे कर भरणाऱ्या व्यावसायिकांची गर्दी वाढू लागली आहे़शहरातील महापालिकेच्या विविध ठिकाणी दुकाने, गाळे, ओटे, जागा भाडे तत्वावर देण्यात आली आहे़ त्यासाठी महापालिका बाजार विभागाकडून वसुली करण्यात येत असते़ मात्र व्यवसायिकांकडून शंभर टक्के वसुली होत नाही़ म्हणुन अभय योजना लागु केली आहे़ या योजनेतुन एकूण थकबाकी रकमेत सवलत देऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते़ यावर्षी १२ ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत थकबाकीचा व्यवसायिकांनी भरणा केल्यास शास्तीच्या रकमेत १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे़ तर १ ते १८ मार्च या कालावधीत भरणा केल्यास ७५ टक्के सवलत, १९ ते ३० मार्च या कालावधीत भरणा केल्यास ५० टक्के सवलत दिली जाणार आहे़दोन टप्यातुन मिळणार सवलतमहापालिकेच्या बाजार विभागाने दुकाने, गाळे, ओटे, जागा भाडे थकबाकीदारांसाठी मनपा अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ नियम ५१ अन्वये व नियम ४१ अन्वये शास्ती माफीची रक्कम आयुक्त आपल्या स्वेच्छा निर्णयानुसार माफ करु शकतात, अशी तरतूद आहे. त्यातुन दरवर्षी थकबाकी धारकांना करात सलवतीसाठी निर्णय घेतला जातो़ दरम्यान त्यासाठी तीन टप्प्यात शास्ती माफी अभय योजना लागू केली आहे. त्यातील पहिला टप्पा पुर्ण झाला आहेत़ तर उर्वरित दोन टप्प बाकी आहेत़ दोन टप्यातुन लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे़शास्तीनंतर आता ठरणार भूमिकाकेलेल्या शास्तीमाफी मोहिमेतील ५० टक्के सवलतीचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता़ असल्याने सायंकाळपर्यतमालमत्ता कर ४८ लाख १९ हजार रूपये तर धनादेश स्वरूपात १३ लाख ६४ हजार रूपये असे एकूण ६१ लाख ८३ हजार रूपये जमा झाले होते़मार्च महिन्यात १०० टक्के वसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे़ तर दुसरीकडे मनपाने शास्ती माफीची मोहिम आधीच जाहीर केली असल्याने नागरिकांना शास्तीवर सवलत देण्यात आली होती़ ही मुदत शुक्रवारी संपुष्टात आली़ शेवटच्या दिवशी सकाळपासूनच नागरिकांनी मनपात रांगा लावून कराचा भरणा केला़ मालमत्ता कराच्या सवलतीचा अंतिम टप्पा असल्याने गुरूवारी मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या़पाणी पट्टी कर २ लाख ४९ हजार रूपये चेक स्वरूपात ७९ हजार अशी एकूण ३ लाख ७८ हजार रूपयांचा भरणा झाला होता़ दरम्यान महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात सवलत देण्यासाठी शास्तीचा निर्णय ११ रोजी घेतला होता आतापर्यत ६५ लाख ६१ हजार रूपये महापालिका नागरिकांनी मालमत्ता व पाणी पट्टी कर भरला आहे़ सोमवार पासुन कर भरण्यासाठी गर्दी होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे