शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख क्विंटल मका पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 22:36 IST

शिंदखेडा : तालुक्यात दोन दिवस अगोदरच खरेदी झाली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यात मका खरेदीला शासनाकडून मोठा गाजावाजा करत सुरुवात झाली. त्यात बारदान नसल्याने अनेक दिवस थोडीफार खरेदी होऊन बंद होत होती. १५ जुलै पर्यंत खरेदीस वाढ देण्यात आली. तत्पूर्वीच १३ तारखेला अचानक खरेदी बंद करण्यात आल्याने आॅनलाइन नोंदणी केलेले १५२३ शेतकऱ्यांचा सुमारे एक लाख क्विंटल मका खरेदीअभावी पडून आहे.त्यात शासनाने खरेदी, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जगाचा पोशिंदाच शासनाच्या धोरणामुळे भिकेला लागण्याची वेळ आली आहे. शासनाने लवकरात लवकर मका खरेदी करण्याची मागणी शासन व लोकप्रतिनिधींकडे शेतकरी करीत आहेत.यावर्षी शिंदखेडा तालुक्यात अतिपावसामुळे खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला. त्यात विहिरींना बºयापैकी पाणी आल्याने खरीपाचा वाया गेलेला हंगाम रब्बी पिकात घेऊ या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी मका व ज्वारी पिकाची लागवड केली. त्यात ऐन हंगामात कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यात १ मे पासून मका व ज्वारी खरेदीला सुरवात झाली. त्यात कधी बारदान नाही, तर कधी हमाल नाही अशी कारणे दाखवून अनेक दिवस बंद राहत होते. त्यात मका खरेदीसाठी खरेदी विक्री संघात १६४६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. अचानक १३ तारखेला खरेदी बंद करण्यात येऊन शासनाचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद करण्याचे कारण सांगितले जात आहे. शासन नुसते उद्दिष्ट्यपूर्तीसाठीच काम करते का असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला असून तात्काळ मका खरेदी न झाल्यास आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत जाणार असून शासनाने नुसते उद्दिष्टे न बघता शेतकºयांचा मका खरेदी करून त्याला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे.तरी शासन व लोकप्रतिनिधी यांनी यात तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.