शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेतही जिल्हा परिषद पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST

परंडा : येथील नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडीतही जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेल्या ‘सत्ता’ पॅटर्नची झलक दिसत असून, जि. ...

परंडा : येथील नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडीतही जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेल्या ‘सत्ता’ पॅटर्नची झलक दिसत असून, जि. प. प्रमाणेच भाजपाशी तडजोड करून राष्ट्रवादीने बांधकाम व मागासवर्गीय कल्याण ही समिती भाजपाला बहाल केली आहे. गुरुवारी विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार तर एक समिती भाजपला देण्यात आली.पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर व सहाय्यक अधिकारी तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी या निवडीची घोषणा केली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती म्हणून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची निवड करण्यात आली. यात चार सदस्य निवडण्यात आले. महिला व बालविकास समिती सभापती म्हणून उपनगराध्यक्षा जिनेरी मन्नाबी मतीन, बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या नगरसेविका उर्मिला विठोबा मदने यांची वर्णी लागली. विशेष म्हणजे, या समितीत सदस्यपदी भाजपचे आ. सुजितसिंह ठाकूर यांचे बंधू सुबोधसिंह ठाकूर व बबड्या उर्फ रामदास भारत जाधव यांची निवड करुन समिती भाजपला देण्यात आली आहे. पाणीपुरवठा व आरोग्य स्वच्छता समिती सभापतीपदी कुरेशी सर्फराज मोहंमद शरीफ तर वाचनालय समितीच्या सभापती म्हणून माने रंजना रामहरी याची निवड करण्यात आली आहे.

परंडा न.प. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. मात्र काही सदस्यांसोबत नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वाद आल्यामुळे न.प. मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सत्तेचा दाखला घेऊन राजकीय ‘आदर्श’ पॅटर्न राबविण्यात आला आहे.

नळदुर्गात निवडी बिनविरोध

नळदुर्ग : गुरूवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात विविध विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. पीठासीन अधिकारी म्हणून उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी उपस्थित होते. यावेळी बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक बसवराज धरणे (काँग्रेस), बालकल्याण सभापती छमाबाई राठोड, स्वच्छता व आरोग्य सभापती दयानंद बनसोडे, पाणीपुरवठा सभापती सुमन जाधव तर नियोजन व विकास सभापती नितीन कासार (सर्व रा. काँ) यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक नितीन कासार, उदय जगदाळे, शहेबाज काझी, निरंजन राठोड, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी, मुश्ताक कुरेशी यांच्यासह महिला नगरसेवक आंबूबाई दासकर, सुमनताई जाधव, काझी, कुरेशी आदी उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, संजय जाधव, सुहास येडगे, तानाजी जाधव, सुनील गव्हाणे आदींसह नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण कुंभार यांची उपस्थिती होती.