काळ्या फिती बांधून केले कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:29+5:302021-07-16T04:23:29+5:30
यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले, कोरोना महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या या काळात आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संकटाचे निराकरण धैर्याने ...

काळ्या फिती बांधून केले कामकाज
यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले, कोरोना महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या या काळात आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संकटाचे निराकरण धैर्याने केले आहे. अशा कर्तव्यनिष्ठ कामगार, कर्मचाऱ्यांच्या हक्काचा संकोच करणारे कायदे मंजूर केले जात आहेत. सरकारी क्षेत्रातील आस्थापनांची अविवेकी खासगीकरण केले जात आहे. तसेच विविध विभागातील रिक्त पदे अद्यापही भरलेले नाहीत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरावीत, सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावार नोकरी तसेच आर्थिक लाभ तत्काळ द्यावा, सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात यावे, जीएसटी संकलनाचा महाराष्ट्र राज्याचा वाटा राज्याकडे वळता करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आल्या. या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधानांना देण्यात आले. निवेदनावर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सरचिटणीस बालाजी पांचाळ, उपाध्यक्ष ए. एफ शेख, कार्याध्यक्ष यशवंत डोलारे, संघटक रवी मोहिते यांची नावे आहेत.