शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना महिला नायब तहसीलदार जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : कोरोना काळात मोफत धान्य वाटप केल्याने त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून रेशन दुकानदारांना आलेली रक्कम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : कोरोना काळात मोफत धान्य वाटप केल्याने त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून रेशन दुकानदारांना आलेली रक्कम काढून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या कळंब येथील महिला नायब तहसीलदाराला सोमवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. सोबतच दोन मध्यस्थी करणाऱ्या दुकानदारांनाही ताब्यात घेण्यात आले.

कोरोनाच्या कालावधीत गरजूंना रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले होते. हे धान्य वाटप केल्याने दुकानदारांना प्रतिक्विंटल १५० रुपयांप्रमाणे शासनाकडून बिल दिले जात आहे. कळंब तालुक्यातील एका रेशन दुकानदाराला तीन महिन्याचे ४४ हजार ६२३ रुपये बिल शासनाने मंजूर केले. हे बिल देण्यासाठी कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन उमर दराज खान पठाण (४७) यांनी बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ६ हजार ६९३ रुपयांची मागणी केली होती. यासाठी रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे (६४, रा. कोथळा) व रेशन दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे (रा. पाथर्डी) यांनी मध्यस्थी सुरु केली होती. दरम्यान, हा सगळा प्रकार तक्रारदार दुकानदाराने लाचलुचपत विभागाचे अधीक्षक प्रशांत संपते यांच्याकडे कथन करत तक्रार दिली. यानंतर संपते यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी तक्रारीची शहानिशा करुन सोमवारी दुपारी कर्मचारी इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर व दत्तात्रय करडे यांच्या सहाय्याने सापळा रचला. यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ६ हजार ७०० रुपयांची लाच देताच या पथकाने लाचखोरांना रंगेहात ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाने तिघांनाही ताब्यात घेऊन याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.