महामार्गावरील प्रलंबित कामे लागणार मार्गी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:50+5:302021-07-17T04:25:50+5:30
(फोटो : राहुल डोके १५) पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी होत्या. यासंदर्भात ...

महामार्गावरील प्रलंबित कामे लागणार मार्गी !
(फोटो : राहुल डोके १५)
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी होत्या. यासंदर्भात पारगावचे उपसरपंच पंकज चव्हाण यांनी औरंगाबाद येथील एनएचआयच्या कार्यालयात जाऊन लेखी निवेदन देऊन काम करण्याची मागणी केली होती. यानुसार एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी करून मोजमाप देखील घेतले. त्यामुळे हे काम लवकरच मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने ग्रामस्थांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थनिक स्तरावर आंदोलन करण्यात आली. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने एनएचआयचे उपसंचालक पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्याच वेळी उपसंचालक पाटील यांनी काम करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासन दिले होते. त्यानुसार एनएचआयच्या वतीने संबंधित कामाचे मोजमाप घेण्यात आले असून, या मोजमापावरून अंदाजपत्रक तयार होऊन प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
150721\1325img-20210715-wa0030.jpg
एन.एच.आय.च्या वतीने कामाचे मोजमाप करून घेताना उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण व एन.एच.आय.चे अधिकारी.