शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

परतीच्या दमदार पावसाने तेरणा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 2:33 PM

On the way to fill the Terna project परतीचा पाऊस दमदार पडत असल्याने प्रकल्पात झपाट्याने पाणी वाढले

ठळक मुद्देआवक कायम राहिल्यास विसर्ग करण्यात येईलनदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला

लोहारा (जि. उस्मानाबाद) : परतीचा पाऊस दमदार पडत असल्याने लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा ओघ झपाट्याने वाढत आहे. बुधवारी (  दि. १४ ) दुपारी बारा वाजेपर्यत प्रकल्प ८५ टक्के भरला असून असाचा पाण्याचा ओघ राहीला तर सायंकाळी सहा वाजता प्रकल्पाचे दरवाजे उचलून विसर्ग करण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सुचना लातूर पाटबंधारे विभागाकडून उस्मानाबाद,लातूर व बिदर (कर्नाटक) जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

लोहारा तालुक्यात गेले अनेक वर्षापासून पावसाच्या प्रमाणात घटच होत आली आहे. त्यातच यावर्षी तर पावसाचा बराच खंड पडला एक दोन दमदार पावसं सोडली तर सुरुवातीपासूनच केवळ रिमझिम पावसावरच समाधान मानावे लागले. पावसाळ्याच्या सुरवातीला तर एकही मोठा पाऊस झाला नाही.त्यामुळे परिसरातील साठवण तलाव, कुपनलिका,विहरी अत्यअल्प पाणीसाठा होता.त्यात पडत गेलेल्या रीमझिम पावसावर खरीपाच्या पिकांने तग धरले. मात्र मोठा पाऊस न झाल्याने नदी, नाले कोरडे ठाक होते. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या कायमच राहिल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या व समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. पण रविवारी ५ सप्टेंबर रोजी सांयकाळी वातावरणात बदल होत रात्री दहाच्या सुमारास पावसाने सुरवात केली.रात्रभर वादळी वाऱ्यासह तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. हा पाऊस सोमवारी ६ सप्टेंबर रोजी पहाटेपर्यंत सुरुच होता. त्यानंतर रात्री ही दमदार पाऊस झाला.

यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच नदी, नाल्यातून पाणी वाहीले आहे. त्यामुळे निम्न तेरणा प्रकल्पात काही प्रमाणात का होईना पाणी साठ्यात वाढ झाली आहे. जुलै अखेर व २५ आॅगस्ट पर्यत प्रकल्पात उणे पाणीसाठा होता. पण २७ आॅगस्ट रोजी या प्रकल्पात २९.४४४ दलघमी पाणी साठा होता. त्यानंतर ८,१६,१९ व २१ सप्टेंबरच्या झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात १८.६३ टक्के इतका पाणीसाठा वाढला होता. त्यानंतर पडत असलेल्या अधून मधून पावसामुळे पाण्याचा ओघ वाढत गेला. त्या परतीचा पाऊस दमदार पडत असल्याने प्रकल्पात झपाट्याने पाणी वाढले त्यात शुक्रवार पासुन पडत असलेल्या पावसामुळे तर मोठ्याप्रमाणात प्रकल्पात पाणीसाठा वाढत गेला. त्यामुळे १४ आॅक्टोबर बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यत प्रकल्पात ८५ टक्के पाणी आहे. त्यामुळे सायंकाळी दरवाजे उघडली जातील या अनुषंगाने लातूर पाटबंधारे विभाग क्रमाक १ यांच्याकडून उस्मानाबाद,लातूर व बिदर (कर्नाटक) जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

आवक कायम राहिल्यास विसर्ग करण्यात येईलमाकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा ओघ झपाट्याने वाढत असून असाच ओघ जर सायंकाळ पर्यत राहीला तर सायंकाळी ६ वाजता प्रकल्पाचे दरवाजे उघण्यात येतील असे शाखा अभियंता के.आर.येणगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाणीसाठा ८५ टक्के असून अजून ही पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडली जातील म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेत नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. असे नायब तहसिलदार रणजित शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादDamधरण