शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईचे सावट! अनियंत्रित पाणी उपस्याने मराठवाड्याची भूजल पातळी ८ मीटरने खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:02 IST

छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याची भूजल पातळी सर्वात खाली; घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ.

-बाळासाहेब मानेधाराशिव : उन्हाची तीव्रता वाढल्याने भूजल पातळीही झपाट्याने कमी होत आहे. मार्चअखेर ८७५ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात मराठवाड्याची पातळी जवळपास ८ मीटरवर खाली गेली आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरची १० मीटर, तर जालना जिल्ह्याची ९ मीटरवर गेली आहे. मानवी हस्तक्षेप आणि अनियंत्रित पाणी उपशामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. लातूर, बीड व परभणी जिल्ह्यातील परिस्थिती या मानाने समाधानकारक आहे. भूजल पातळी खालावल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

भूजल सर्वेक्षण विभाग आणि विकास यंत्रणेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीची मोजणी केली जाते. मार्चअखेर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील भूजल विभागाने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये आठ जिल्ह्यांतील जवळपास ८७५ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पाणी पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ जालना, हिंगोली, धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यातील पाणी पातळी ७ मीटरवर असून, ही स्थिती समाधानकारक असल्याचे दिसत आहे. गतवर्षी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक अपेक्षित होती. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि अनियंत्रित पाणी उपशामुळे पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. याचा परिणाम गावागावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बंद पडून सर्वसामान्य नागरिकांवर घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

सर्वाधिक छत्रपती सभाजीनगर जिल्ह्याच्या विहिरींचे निरीक्षणभूजल विभागाच्या वतीने मार्च अखेर प्रत्येक जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले असून, ८७५ विहिरींची नोंद घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४१ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही नोंद भूजल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतली जाते. त्यानुसार भूजल पातळीचा अंदाज काढला जातो.

अनेक विहिरींचे अस्तित्व धोक्यातजिल्ह्याची पाणीपातळी निश्चित करण्यासाठी भूजल विभागाकडून काही शासकीय, तर काही खासगी विहिरींचे सर्वेक्षण केले जाते. यातील बहुतांश गावांतील विहिरी गाळाने भरलेल्या आहेत, तर काही विहिरींमध्ये झुडपे उगवलेली आहेत. यामुळे भूजल विभागाचे निरीक्षण कितपत योग्य आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

०.६१ मीटरने पाणी पातळी अधिकगतवर्षी मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्या तुलनेत भूजल पातळी सुधारणे अपेक्षित होते. मात्र, मार्चअखेर केलेल्या सर्वेक्षणात गत पाच वर्षांच्या तुलनेत केवळ ०.६१ मीटर पातळी अधिक दिसून आली आहे.जिल्हानिहाय भूजल पातळी व विहिरी

जिल्हा - पाणी पातळी - निरीक्षण विहिरीछ. संभाजीनगर - ९.४८ - १४१

जालना - ८.३९ - ११०परभणी - ७.०८ -८६

हिंगोली - ७.९२ - ५५नांदेड - ७.४३ - १३४

लातूर - ६.६६ -१०९धाराशिव - ७.७३ - ११४

बीड - ७.०० -१२६एकूण - ७.७१ - ८७५

पाण्याचा उपसा अधिकमार्च महिन्यात भूजल विभागाने धाराशिव जिल्ह्यातील ११४ विहिरींचे निरीक्षण केले आहे. यामध्ये जिल्ह्याची पाणी पातळी ७.७३ मीटरवर असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पाण्याचा उपसा अधिक होत असल्याने पातळी खालावत आहे.-रवींद्र मांजरमकर, भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, धाराशिव.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada faces water scarcity: Groundwater drops 8 meters due to over-extraction.

Web Summary : Marathwada's groundwater level plummeted 8 meters, with Aurangabad worst-hit at 10 meters, due to excessive water usage. Latur, Beed, and Parbhani are comparatively better. This decline raises serious concerns about drinking water shortages.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीdroughtदुष्काळ