पशुवैद्यकीय दवाखाने सुंदर व परिपूर्ण असावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:51+5:302021-02-08T04:28:51+5:30
(फोटो : बीबीसी /झेडपी ०६) उस्मानाबाद : पशुवैद्यकीय केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या पशुंवर योग्य उपचार होतील व तेथील ...

पशुवैद्यकीय दवाखाने सुंदर व परिपूर्ण असावेत
(फोटो : बीबीसी /झेडपी ०६)
उस्मानाबाद : पशुवैद्यकीय केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या पशुंवर योग्य उपचार होतील व तेथील परिसर स्वच्छ, सुंदर असेल, याची खबरदारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी दिले.
जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची एक दिवसीय तांत्रिक कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पशु वैद्यकीय दवाखान्यात औषध असावे, पशु वैद्यकांचे ज्ञान अद्ययावत असावे, दवाखान्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, पाण्याची व्यवस्था असावी, अशा सूचनाही डॉ. फड यांनी यावेळी दिल्या. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील पसरटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव, जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.
चौकट.........
पशुधनासाठी पुरेल इतका चारा लावावा
रुग्णालय परिसरात वृक्षलागवड करावी, स्वच्छता असावी, येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पशुधनासाठी पुरेल इतका चारा लावावा, पशुवैद्यकीय केंद्रात जंगली पशुसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, प्रयोगशाळा असावी, आधुनिक हत्यारे - अवजारे असावेत व ग्रंथालय असावे, असेही डॉ. फड यावेळी म्हणाले.