शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST

(फोटो : अविनाश ईटकर ११) सोनारी : ‘स्वच्छ भारत.. स्वच्छ गाव’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याबाबत ...

(फोटो : अविनाश ईटकर ११)

सोनारी : ‘स्वच्छ भारत.. स्वच्छ गाव’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याबाबत शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते. मात्र, परंडा तालुक्यातील सोनारी गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे कोरोनाची धास्ती अन्‌ गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे भविष्यात कोरोनाच्या प्रादुर्भावास थांबविताना इतर आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. सोनारी ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो का, असा प्रश्न सद्य:स्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून, ते घाणपाणी रस्त्यावर वाहताना दिसते. कचरा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, नकळत दूषित पाणी प्यायले जाते. यातून जुलाब, उलटी, टायफाइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार होण्याची शक्यता आहे.

ठिकठिकाणी खड्ड्यात साचणारे पाणी व नाल्या साफसफाई करून रोगराई पसरण्याच्या अगोदरच ग्रामपंचायतने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.