धानुरीत ‘रोहयो’तून दोन विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST2021-04-10T04:32:11+5:302021-04-10T04:32:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोहारा : तालुक्यातील धानुरी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दोन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. ...

Two wells sanctioned from ‘Rohayo’ in Dhanur | धानुरीत ‘रोहयो’तून दोन विहिरी मंजूर

धानुरीत ‘रोहयो’तून दोन विहिरी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क

लोहारा : तालुक्यातील धानुरी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दोन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. ‌ या विहिरींचे भूमिपूजन जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. दीपक जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले. शीतलनगर तांडा येथे एक तर गावालगत असलेल्या व्यंकट साळुंके यांच्या शेतातील साठवण तलावात दुसरी विहीर मंजूर करण्यात आली आहे. या दोन विहिरींसाठी १३ लाख ९४ हजार रुपये मंजूर आहेत. यापैकी साठवण तलावातील विहिरीचे भूमिपूजन ॲड. दीपक जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धानुरीचे सरपंच प्रवीण थोरात, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच बालाजी वडजे, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई. टी. सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी प्रदीप जाधव, परमेश्वर साळुंके, नितीन पाटील, श्रीकांत वडजे, सचिन तिगाडे, नेताजी लुटे, आरीफ देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Two wells sanctioned from ‘Rohayo’ in Dhanur