नागेवाडीतील तीन घरे फाेडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:27+5:302021-07-18T04:23:27+5:30

ईट (जि. उस्मानाबाद) -भूम तालुक्यातील नागेवाडी येथील तीन घरे फाेडून अज्ञाताने राेख रकमेसह दागिने लंपास केले. ही घटना १६ ...

Three houses in Nagewadi were demolished | नागेवाडीतील तीन घरे फाेडली

नागेवाडीतील तीन घरे फाेडली

ईट (जि. उस्मानाबाद) -भूम तालुक्यातील नागेवाडी येथील तीन घरे फाेडून अज्ञाताने राेख रकमेसह दागिने लंपास केले. ही घटना १६ जुलैच्या मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळी ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकास पाचारण करण्यात आले हाेते.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नागेवाडी येथे ज्याेतिराम साळुंखे, लिंबा गपाट व अर्जुन साळुंखे यांची घरे आहेत. १६ जुलैच्या मध्यरात्री कुटुंबीय झाेपेत असतानाच अज्ञात चाेरट्यांनी अर्जुन साळुंखे यांच्या घराच्या दरवाजावरील काेयंडा ताेडून आत प्रवेश मिळविला. यानंतर घरातील साहित्याची नासधूस करून घरातील साेन्याचे दागिने व राेख रक्कम मिळून ४९ हजारांचा ऐवज घेऊन तेथून काढता पाय घेतला. यानंतर चाेरट्यांनी लंबा गपाट यांच्या घराकडे माेर्चा वळविला. परंतु, तेथे हाती काहीच लागले नाही. दरम्यान, चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर अर्जुन साळुंखे यांनी वाशी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करून तपासाला गती दिली. घटनेचा अधिक तपास पाेहेकाॅ अच्युत कुटे हे करीत आहेत.

Web Title: Three houses in Nagewadi were demolished