शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीलायक पाऊस नाही

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली.

तामलवाडी : मृग नक्षत्र संपले तरी तामलवाडी परिसरात अद्याप पेरणीलायक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच सोयाबीन व कांदा बियाणाचे भाव दुपटीने वाढले असून, सद्यस्थितीत शासनाकडून मिळणारे गारपिटीचे अनुदानच शेतकऱ्यांना खरिपातील पेरण्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे.७ जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु, अद्याप या भागात एकही दमदार पाऊस झाला नाही. यामुळे मशागतीची कामे करुन पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाचे वेळापत्रक बिघडत चालले आहे. त्यातच या हंगामात सोयाबीनच्या बियाणाची पिशवीचा भाव २६०० रुपये तर कांदा बियाणाच्या १ किलोचा भाव ३२०० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे बियाणे हे घरगुती वापरावे असा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. (वार्ताहर)बँक शाखेभोवती शेतकऱ्यांची गर्दीतामलवाडी येथील जिल्हा बँक शाखेभोवती सध्या अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे. तासन् तास रांगा लावल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांअभावी वाटप संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळविण्यासठी किमान दोन दिवस लागतात. आणखीन किती दिवस हे वाटपाचे सत्र सुरु राहणार हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे.टप्प्याटप्प्याने वाटपसांगवी (काटी), वडगाव (काटी), सुरतगाव, जळकोटवाडी, पांगरधरवाडी या गावचे गारपीट अनुदान वाटप टप्प्याटप्प्याने सुरु आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शासनाने मंजूर केलेले अनुदान बियाणे खरेदीसाठी आधार ठरत असून, खासगी सावकाराचे उंबरठे झिजविणे काहीसे बंद झाले आहे.