तेली समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:16+5:302021-07-27T04:34:16+5:30

उस्मानाबाद : अखिल भारतीय तैलिक साहू महासभा यांच्या अंतर्गत महाराष्ट्र प्रांतिक तेली सभा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री ...

Teli Samaj Sanghatana's executive announced | तेली समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर

तेली समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर

उस्मानाबाद : अखिल भारतीय तैलिक साहू महासभा यांच्या अंतर्गत महाराष्ट्र प्रांतिक तेली सभा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यात प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण निर्मळे, उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे, ज्येष्ठ आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेंगले, उस्मानाबाद शहराध्यक्ष शिवलिंग होनखांबे, युवक शहराध्यक्ष जितेंद्र घोडके, सचिव गणेश घोडके, जिल्हा सचिव संतोष क्षीरसागर, नागेश निर्मळे यांचा समावेश आहे. तेली समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष रवी कोरे आळणीकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे, दीपक नाईक आदींची उपस्थिती होती.

Web Title: Teli Samaj Sanghatana's executive announced