अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील नववीच्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समाेर आल्यानंतर पाेलिसांनी दाेघांना अटक केली, परंतु तिसरा आराेपी अद्याप हाती लागेला नाही. या घटनेच्या निषेधार्थ ३१ जानेवारी राेजी ग्रामस्थांनी गावातून निषेध रॅली काढली. यानंतर निषेध सभा घेऊन गाव बंद ठेवले.
अणदूर येथील नववीच्या वर्गामध्ये शिकणारी १४ वर्षीय मुलगी २७ जानेवारी राेजी दुपारी घरी एकटीच हाेती. हीच संधी साधत घराशेजारीच वास्तव्यास एकाने संबंधित मुलीस घरातून बळजबरीने उचलून नेऊन तिघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना समाेर आल्यानंतर नळदुर्ग पाेलीस ठाण्यात सागर घाेडके, आनंद घाेडके व मुकेश घाेडके या तिघांविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (३ व ड) नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे. यातील दाेघांना अटक करण्यात आली आहे, तर आनंद घाेडके हा आराेपी फरार आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करीत रविवारी गाव बंद ठेवण्यात आले, तसेच गावातून रॅली काढण्यात आली. यानंतर, निषेध सभाही झाली. संबंधित नराधमास तातडीने अटक करून कठाेर शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निषेध सभेत ॲड.दीपक आलुरे, माणिक आलुरे, दीपक घाेडके, सिद्राम नरे, साहेबराव घुगे, अरविंद घाेडके, बसवराज नरे, राजेश देवशंकर, लिंगय्या स्वामी, दीपक घुगे, सोमनाथ शेटे, धनराज मुळे, राजकुमार स्वामी, महावीर कंदले, चंद्रशेखर कंदले, ॲड. विशाल शेटे, सिद्धाराम धमुरे, मनोज मुळे, संजीव आलुरे, श्रीकांत अणदुरकर, आप्पाराव मुळे, सुरेश ठोंबरे, नागनात आलुरे, विक्रम आलुरे, संतोष नरे, देवेंद्र घुगे आदी सहभागी झाले हाेते.
चाैकट...
अन्यथा नळदुर्ग ठाण्यासमाेर आंदाेलन
तीनपैकी दाेघा आराेपींना बेड्या ठाेकण्यात आल्या आहेत. आजही तिसरा आराेपी पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. या आराेपीस तातडीने अटक करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने २ फेब्रुवारी राेजी नळदुर्ग ठाण्यासमाेर आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा अणदूर ग्रामस्थांनी दिला.
310121\31osm_1_31012021_41.jpg
अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर रविवारी अणदूर येथे निषेध सभा घेऊन गाव बंंद ठेवण्यात आले. फरार आराेपीस तातडीने अटक करण्याची मागणी केली.