विनापरवाना बायोडिझेल विक्री थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:51+5:302021-07-17T04:25:51+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये विनापरवाना होत असलेल्या बायो डिझेलची विक्री थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पेट्रोल पंपचालक, ...

Stop selling unlicensed biodiesel | विनापरवाना बायोडिझेल विक्री थांबवा

विनापरवाना बायोडिझेल विक्री थांबवा

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये विनापरवाना होत असलेल्या बायो डिझेलची विक्री थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पेट्रोल पंपचालक, मालक असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, केमिकलच्या नावाने गुजरात राज्यातून बायोडिझेलचे टँकर आणले जात असून, उमरगा तालुक्यामध्ये कर्नाटक सीमेवर तसेच तुळजापूर तालुक्यामध्ये याची विक्री चालू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी नसताना व काही पंप सील केले असतानासुद्धा बायोडिझेलची विक्री चालू आहे. त्यामुळे या अवैध बायोडिझेल विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी जिल्हा पेट्रोल पंपचालक, मालक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, रवींद्र शेरखाने, अब्दुल सत्तार, प्रशांत कुदाळ, गिरीश हंबीरे, गोपाळ देशमुख, अभिजित मोहेकर, प्रतीक्षित खामकर, वैभव उंबरे, महादेव कांबळे तसेच सर्व डीलर उपस्थित होते.

Web Title: Stop selling unlicensed biodiesel