चाेरीची दुचाकी केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:39+5:302021-02-05T08:19:39+5:30
कायद्याचे उल्लंघन करणे भाेवले उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४५२ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी ...

चाेरीची दुचाकी केली जप्त
कायद्याचे उल्लंघन करणे भाेवले
उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४५२ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे १ लाख ५ हजार रुपये वसूल करण्यात आले ही कारवाई अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आली. ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
दाेन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद - सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वाहन उभे केल्याप्रकरणी रामराजे बाबूराव लखापते व रामलिंग भगवान चिंचकर ( दाेघे, रा. तांदुळजा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यांनी आपल्या ताब्यातील वाहने शिराढाेण टी पाॅईंट रस्त्यावर उभी केली हाेती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा झाला.
मस्सा येथील दाेन घरे फाेडली
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील मस्सा (खं.) येथील ज्ञानेश्वर तुकाराम वरपे व त्यांचे नातेवाईक अच्युत शंकर वरपे यांची घरे फाेडल्याची घटना २५ ते २६ जानेवारीदरम्यान घडली. या घटनेत चाैदा ग्रॅम साेन्याचे दागिने व राेख ७७ हजार ८५० रुपये लंपास केले. याप्रकरणी कळंब ठाण्यात अज्ञाताविरुद्ध २८ जानेवारी राेजी गुन्हा नाेंद करण्यात आला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे राहत्या गल्लीतून अज्ञाताने अपहरण केले. ही घटना २७ जानेवारी राेजी घडली. या प्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूद्ध भादंसंचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
भूखंडाच्या कारणावरून मारहाण
उस्मानाबाद - लाेहारा तालुक्यातील दस्तापूर येथील जगदीश शिवाजी पाटील व सुलन शिवाजी पाटील यांनी भूखंड वाटणीच्या कारणावरून बालिका शिवाजी पाटील यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बालिका पाटील यांच्या फिर्यादीवरून उपराेक्त दाेघांविरुद्ध मुरूम ठाण्यात २८ जानेवारी राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.